Pimpari-Chinchwad | वाकडमध्ये गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकानं जळून खाक

पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील वाकड (Wakad) परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.

Pimpari-Chinchwad | वाकडमध्ये गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकानं जळून खाक
Pimpari-Chinchwad Fire

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील वाकड (Wakad) परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.

नेमकं काय घडलं?

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथील भुजबळ चौकाजवळील एका गादीच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळाले झाले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील पसरली होती. त्यामुळे तीन दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी, रहाटणी उपकेंद्र, हिंजवडी, पीएमआरडीए येथील पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. ही नेमकी कशामुळे लागली याचा तपास आता सुरुये.

वरळीत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट, चार महिन्याच्या बाळासह चौघे होरपळले

वरळीतील कामगार वसाहत येथील बीडीडी चाळ क्रमांक 3 मधील एका घरात मंगळवारी सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग लेव्हल 1 ची असल्याची माहिती आहे.

चारजण जखमी, दोघं गंभीर

या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका चार महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. आनंद पुरी (वय 27), मंगेश पुरी (4 महिने), विद्या पुरी (वय 25), विष्णू पुरी (वय 5) हे चौघे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आनंद पुरी आणि चार महिन्यांचे बाळ यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तर विद्या पुरी आणि विष्णू पुरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

Cylinder Blast | वरळीत सिलेंडर स्फोट, चार महिन्याच्या बाळासह चौघे होरपळले

Video – Nagpur उपलवाडीतील गोदामाला आग, तीन गोदाम जळून खाक

Published On - 7:38 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI