पिंपरीतील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे पोलिसांच्या ताब्यात, बनावट कागदपत्रांनी जमीन विक्रीचा ठपका

पिंपरीतील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे पोलिसांच्या ताब्यात, बनावट कागदपत्रांनी जमीन विक्रीचा ठपका
नगरसेवक राजेंद्र लांडगे

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. ( BJP Corporator Rajendra Landge )

अनिश बेंद्रे

|

May 28, 2021 | 9:36 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे (Rajendra Landge) यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा ठपका लांडगेंवर ठेवण्यात आला आहे. लांडगेंसह एका जमीन खरेदीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकाचा शोध सुरु आहे. (Pimpri Chinchwad BJP Corporator Rajendra Landge detained in Forged Land selling case)

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. मूळ मालक नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीन विक्रीचा ठपका लांडगेंवर ठेवण्यात आला आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांपैकी मनोज शर्माही पोलिसांच्या ताब्यात असून रविकांत ठाकूरचा शोध सुरु आहे. याविषयी दोन्ही खरेदीदारांनाही माहिती असल्याचं समोर आलं आहे.

पॉवर ऑफ अॅटर्नीही बनवली

राजेंद्र लांडगेंनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहर सुधारणा समितीचे सभापतीपद, स्थायी समितीचे सदस्यत्व भूषवले आहे. नगरसेवक लांडगे यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी, ताबा पावती केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

कोण आहेत राजेंद्र लांडगे?

राजेंद्र किसनराव लांडगे हे पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात पिंपरी चिंचवड शहर सुधारणा समितीचे सभापतीपद भूषवले पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीचे सदस्यत्वही भूषवले पिंपरी चिंचवड भाजपचे क क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष भाजप भोसरी चऱ्होली मंडळाचे अध्यक्ष

राष्ट्रवादीच्या आमदारपुत्रालाही बेड्या

दुसरीकडे, पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या मुलाला कालच अटक करण्यात आली. सिद्धार्थ बनसोडे (Siddharth Bansode) याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

अन् पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले!

बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडी चौकशी, हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील जमीन लाटल्याचा आरोप

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीत सिद्धार्थला बेड्या

(Pimpri Chinchwad BJP Corporator Rajendra Landge detained in Forged Land selling case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें