AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आपल्या हद्दीतल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला, मुली, मागासवर्गीय, एचआयव्हीबाधित, कुष्ठपिडित आदींसाठी शिक्षण, घर, शस्त्रक्रिया, पुनर्वसन आणि इतर बाबींसाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहय्य केलं जातं.

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 5:43 PM
Share

पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यासोबतच वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवत असतात.

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आपल्या हद्दीतल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला, मुली, मागासवर्गीय, एचआयव्हीबाधित, कुष्ठपिडित आदींसाठी शिक्षण, घर, शस्त्रक्रिया, पुनर्वसन आणि इतर बाबींसाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहय्य केलं जातं. अशा विविध योजनांची आपण ओळख करून घेणार आहोत. (Pimpri Chinchwad Municipal Corporation provides financial support to the backward class students for the medical education after 12th standard.)

मागासवर्गीय कल्याणकारी योजना

या योजनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या आणि बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महापालिकेकडून अर्थसहाय्य केलं जातं. यासाठी विद्यार्थ्यांना काही अटींची पूर्तता करायची आहे. यासोबतच काही कागदपत्र महापालिकेत जमा करायची आहेत.

कसा आणि कुठे करणार अर्ज?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना, महापालिका, पिंपरी चिंचवड यांच्याकडे लेखी अर्ज करायचा आहे. या अर्जाचा नमुना महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अर्जात विद्यार्थ्याला आपलं पूर्ण नाव, पत्ता, वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव, प्रवेश घेतलेला दिनांक, बँक खात्याचा तपशील इत्यादी बाबी भरून द्यायच्या आहेत. यासोबतच दिलेली सर्व माहिती खरी आहे हे सांगण्यासाठी प्रतिज्ञापत्रही भरून द्यायचं आहे. विद्यार्थी महाविद्यालयात शिकत असल्याचा पुरावा म्हणून महाविद्यालयाचे सर्टिफिकेटही सोबत जोडायचं आहे.

कोणती कागदपत्रं जोडायची?

लाभार्थी विद्यार्थी हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत वास्तव्य करत असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचा सक्षम अधिकाऱ्यांकडून करून घेतलेला जातीचा दाखला, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल शुल्क भरलेली पावती किंवा बोनाफाई़ड प्रमाणपत्र, शासनाने विहित केलेल्या केलेल्या पद्धतीनुसार फ्रीसीट किंवा मेरीटसीट प्रवेशपत्र ही कागदपत्र अर्जासोबत जोडायची आहेत.

काय आहेत योजनेच्या अटी?

पिंपरी चिंचवड महापालिकेची ही मागासवर्गीय कल्याणकारी अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रर्गांसाठीच देय आहे. यासोबतच महापालिकेकडून केलं जाणारं हे अर्थसहाय्य इ. बारावीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रथम वर्षासाठी आणि एकदाच केलं जाणार आहे.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या कार्यालयात भेट द्या.

संबंधित बातम्या :

पुण्यात घर घ्यायचंय? ‘म्हाडा’ लवकरच काढतंय एक हजार घरांची लॉटरी, कधी आहे सोडत?

PCMC Elections | पिंपरी-चिंचवडमध्ये कच्च्या प्रभागरचनेला सुरूवात, वॉर्डांमध्ये बदल होणार?

फेरीवाल्यांना व्यवसाय वाढवण्याची सुवर्णसंधी! स्वनिधी योजनेत आता मिळणार 20 हजारांचं कर्ज, कोण आहेत पात्र?

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.