Pune corona | पुणे व पिंपरीतील पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात 61 कर्मचारी बाधित ;9जणांवर रुग्णालयात उपचार

शहराच्या विविध भागात सतत होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीस नागरिकांच्या मिसळत असल्याने त्यांना विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला पिंपरीतील एक अधिकारी व चार कर्मचारी, अशा पाच पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune corona | पुणे व पिंपरीतील पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात 61 कर्मचारी बाधित ;9जणांवर रुग्णालयात उपचार

पुणे – शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्याबरोबर फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पुणे पोलीस दलातील जवळपास 48 पोलीस कर्मचाऱ्यांना तर पिंपरी पोलिस आयुक्तालयातील 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समीर आले आहे. पुणे पोलीस दलातील आतापर्यंत 361 कर्मचारी ,अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधित झाले आहेत. पिंपरीमधील आतापर्यंत 997 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सद्यस्थिती काय आहे.

कोरोनाच्या विषाणूंमुळे शहरात निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस सातत्याने कार्यरत असलेले दिसून येत आहे. शहराच्या विविध भागात सतत होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीस नागरिकांच्या मिसळत असल्याने त्यांना विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला पिंपरीतील एक अधिकारी व चार कर्मचारी, अशा पाच पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 4 कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात 15 मे 2020 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आजपर्यंत 997  पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. त्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. डिसेंबर अखेरीस शहरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळू लागले. त्यात पोलिसांनाही संसर्ग झाला.

दहा दिवसांचे विलगीकरण

कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या विलगीकरणाबाबत शासनाने नव्याने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार 10 दिवस विलगीकरण आवश्यक आहे. त्यानुसार लक्षणे नसली तरी, पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यातील 99 टक्के पोलिसांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेलं आहेत. संसर्ग झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहेत.

Uttar Pradeshमध्ये निवडणूक लढवून Shivsena पक्षाचं अस्तित्व दाखवणार -संजय राऊत

Cotton Rate : कापसाचे उत्पादन घटले मात्र, विक्रमी दरामुळे भरपाई, काय आहे विदर्भातले चित्र?

UP Election 2022 | टिकैत, मथुरा आणि शिवसेना, उत्तर प्रदेशसाठी ठाकरेंचा महाप्लॅन काय? राऊतांनी सविस्तर सांगितलं

Published On - 10:37 am, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI