तिसऱ्या लाटेसाठी जय्यत तयारी; पुण्यात 16 ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्वित

तिसऱ्या लाटेसाठी जय्यत तयारी; पुण्यात 16 ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्वित
दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा

Covid vaccine | पुणे शहर कार्यक्षेत्रात 6, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात 2 तर ग्रामीणमध्ये 8 प्लांट कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे 12 हजार 994 ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढली तर, आणखीन 43 प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 10, 2021 | 3:42 PM

पुणे: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. हा अनुभव पाहता पुण्यात आतापर्यंत 16 ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहेत. पुणे शहर कार्यक्षेत्रात 6, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात 2 तर ग्रामीणमध्ये 8 प्लांट कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे 12 हजार 994 ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढली तर, आणखीन 43 प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व प्लांट कार्यान्वित झाल्यावर जिल्ह्याच्या ऑक्सिजन उत्पादकतेत मोठी भर पडेल. (Coronavirus situation in Pune)

ठाण्यात तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ब्रेक द चेन अंतर्गत नियम लागू होत असून जिल्ह्यात या आठवड्यातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक निर्बंध घालण्यात आले आहेत. दर शुक्रवारी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांचा स्तर ठरवण्यात येतो. तिसऱ्या टप्यात तिसऱ्या स्तराचे हे निर्बंध १९ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत असले तरी मात्र दररोज कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये शंभरीचा टप्पा गाठला जात आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना जिल्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्याचा स्तर तिसऱ्या टप्यात असल्याने निर्बंध शिथिल केले गेले नाहीत.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक निर्बंधांतून सुटणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coroanvirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट मिळू शकते. अशा नागरिकांना कार्यालये व इतर ठिकाणी प्रवेशासाठी सवलत देण्याचा विचार सुरु आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे लोकल ट्रेन आणि इतर सेवांवर निर्बंध आहेत. मात्र, दीर्घकाळ निर्बंध लागू असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून निर्बंध काहीप्रमाणात शिथील करून नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी; अजित पवारांकडून पुण्यातील कोव्हिड स्थितीचा आढावा

पुण्याच्या ग्रामीण भागात 55 टक्के लसीकरण, मुळशी आणि वेल्हा तालुक्याची लसीकरणात आघाडी

पुण्याच्या ‘या’ भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

(Coronavirus situation in Pune)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें