AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा : पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना घेतले ताब्यात; ‘या’ कारणामुळे प्रितम मुंडे कार्यक्रमास अनुपस्थित

श्री क्षेत्र देहूत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पारपडत असलेल्या श्री संत तुकाराम महारांजाच्या  शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पार पडत आहे . त्यासाठी भाजपा खासदार प्रितम मुंडेंना तुकाराम महाराज देहू संस्थाननं मोदींच्या सोहळ्यांच निमंत्रण पाठवलं होतं. मात्र खासदार प्रितम मुंडे नियोजित परदेश दौऱ्यावर असल्याने या सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा : पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना घेतले ताब्यात; 'या' कारणामुळे प्रितम मुंडे कार्यक्रमास अनुपस्थित
Maruti Bhapkar Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 12:52 PM
Share

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा(Prime Minister Narendra Modi) दौरा सुरु होण्यास अवघे काही मिनिटे उरले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून (Police)सुरक्षेची सर्व खबदारी घेतली जात आहे. दौऱ्याच्या दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना नोटिसाही पाठवण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर(Maruti  bhapkar) यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भापकर हे मोदींच्या दौऱ्यात रेल्वे लाईनग्रस्तांच्या प्रश्नाप्रकरणी आंदोलन करणार होते. पंतप्रधान मोदींचे  लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं भापकर म्हणाले आहेत.

रविकांत वरपे यांनाही  नोटीस

याबरोबरच भाजपच्या फलक बाजीवरून वाद निर्माण झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वरपे यांना 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की आपणअथवा आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपणाला सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन प्रचलित कायद्यानुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा कोणताही प्रश्न निर्मण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.

 प्रितम मुंडे देहूतील लोकार्पण सोहळ्यास अनुपास्थित

श्री क्षेत्र देहूत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पारपडत असलेल्या श्री संत तुकाराम महारांजाच्या  शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पार पडत आहे . त्यासाठी भाजपा खासदार प्रितम मुंडेंना तुकाराम महाराज देहू संस्थाननं मोदींच्या सोहळ्यांच निमंत्रण पाठवलं होतं. मात्र खासदार प्रितम मुंडे नियोजित परदेश दौऱ्यावर असल्याने या सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहे. याबाबत मुंडे यांनी सोहळ्यास उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र संस्थानला पाठविले आहे. त्यांनी आपल्या पात्रात म्हटले आहे की भारताबाहेर असल्यानं सोहळ्याला मला उपस्थित राहता येणार नाही. मात्र भविष्यात माझ्या हातून वारकरी सांप्रदायची सेवा घडत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना. असे म्हटले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.