AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या या आमदारांना मिळाले मोठे ‘गिफ्ट’

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी बंड पुकारले. त्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आल्याचा दावा केला जात आहे. आता पुणे जिल्ह्यातील या आमदारांना त्याचे गिफ्टही मिळाले आहे.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या या आमदारांना मिळाले मोठे 'गिफ्ट'
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 21, 2023 | 10:58 AM
Share

पुणे | 21 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत अजित पवार यांनी बंड पुकारले. अजित पवार यांच्यासह नऊ जण शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. या आमदारांनी विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत आल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार अजित पवार यांनी त्यांना गिफ्ट दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना गिफ्ट मिळाले आहे.

काय मिळाले आमदारांना

पुणे जिल्ह्यातील खेडचे येथील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगाव येथील आमदार दिलीप वळसे पाटील यांन अजित पवार यांची साथ घेतली. यावेळी आपण आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. आता या दोघांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे गिफ्ट मिळाले आहे.

काय मिळाले आमदारांना

विकासासाठी अजित पवार यांची साथ दिल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. आता अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्याला आदिवासी भागाच्या विकासासाठी भरुभरुन निधी त्यांना दिला आहे. दिलीप वळसे यांच्या मतदार संघात 29 कोटी 80 लाखांचा निधी आदिवासी भागाच्या विकासासाठी, तर बिगर आदिवासी भागाच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी दिला आहे. तसेच खेड तालुक्याला पश्चिम पट्ट्याच्या विकासासाठी दिलीप मोहिते यांना 25 कोटींचा निधी दिला. पावसाळी अधिवेशनात 80 कोटींचा निधी अजित पवार यांनी दिला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर झाला आहे.

शिरुरमधील पाच आमदार अजित पवार गटासोबत

शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यामुळे या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हे सर्वच जण अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. आमदार दिलीप मोहिते तर अजित पवार यांच्या मागे नेहमी भक्कमपणे उभे असतात. २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी ते अजित पवार यांच्यासोबत होते. दिलीप वळसे यांना शरद पवार यांचे मानसपूत्र म्हटले जात होते. परंतु त्यांनी विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका घेतली.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.