AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Lockdown | पवारांच्या बारामतीत कडक लॉकडाऊन, सात दिवसांसाठी निर्बंध लागू होणार

5 ते 11 मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन असेल. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. (Pune Baramati Lockdown Corona)

Baramati Lockdown | पवारांच्या बारामतीत कडक लॉकडाऊन, सात दिवसांसाठी निर्बंध लागू होणार
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 03, 2021 | 2:24 PM
Share

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामती मतदारसंघात कडक लॉकडाऊन (Baramati Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. बारामतीत येत्या बुधवारपासून (परवा, 5 मे 2021) सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. (Pune Baramati Lockdown for 7 Days ahead of Corona form 5th to 11th May)

बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 5 ते 11 मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन असेल.

काय आहे नियमावली?

बारामतीत दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मुभा असेल. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.

अजित पवारांकडून आढावा

गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक घेत बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजित पवारांनी जाणून घेतली होती. अजित पवार यांनी बारामतीतल्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वीकेंडला लॉकडाऊनला प्रतिसाद

राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुकारलेल्या वीकेंडला लॉकडाऊनला बारामतीत 100 टक्के प्रतिसाद मिळाला होता. मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. बारामतीत प्रत्येक चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने पोलिसांकडून चौकशी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. इतकंच नाही, तर बारामतीत विनाकारण मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींची ॲंटीजेन तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

भारतात आणखी दोन-तीन महिने लसींचा तुटवडा जाणवणार: अदर पुनावाला

भारतातील नागरिकांना दिलासा, कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काहीशी घट

(Pune Baramati Lockdown for 7 Days ahead of Corona form 5th to 11th May)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.