Pune News : पुणे शहरातील 200 मार्गांवर बसेस आता या पद्धतीने धावणार, प्रवाशांचे 20 ते 25 मिनिटे वाचणार

PMPML Starts Non-Stop Bus : पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सूत्र हाती घेतल्यापासून वेगवेगळे बदल करणे सुरु केले आहे. पुणे शहरात नॉन स्टॉप बससेवेचा प्रयोग राबवला गेला. आता या बसेस सर्वत्र सुरु होणार आहे.

Pune News : पुणे शहरातील 200 मार्गांवर बसेस आता या पद्धतीने धावणार, प्रवाशांचे 20 ते 25 मिनिटे वाचणार
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 3:12 PM

पुणे | 9 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास पुणेकर प्रतिसाद देत आहे. यामुळे पुणे मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न आता सुरु आहे. PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून बस सेवेत विविध बदल केले जात आहे. सूत्र घेतल्यानंतर त्यांनी आधी चालक आणि वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वत: बसमधून प्रवास करत कर्मचाऱ्यांना संदेश दिला. प्रयोगिक पातळीवर दोन विना कंडक्टर बसेस सुरु केल्या. आता सुपरफास्ट बसचा आनंद पुणेकरांना येणार आहे.

पुणे शहरात 200 ‘नॉन-स्टॉप’ मार्ग

मेट्रोला जोडून फिडर सर्व्हिस सुरु केली आहे. त्यामुळे अनेकांचा वेळ वाचत आहे. आता बसने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पुणे शहरात 200 मार्गांवर ‘नॉन-स्टॉप’ बसेस धावणार आहे. या बसेसमध्ये कंडक्टर नसणार आहे. यापूर्वी दोन मार्गांवर प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजाणी झाली होती. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 200 मार्गांवर ‘नॉन-स्टॉप’ बसेस सुरु केल्या जाणार आहे. त्यासाठी सर्व्हे केला गेला. लवकरच ही बस सेवा सुरु होणार आहे.

प्रवाशांचे 20 ते 25 मिनिटे वाचणार

पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. पीएमपीच्या नॉन-स्टॉप सेवेमुळे प्रवाशांचे 20 ते 25 मिनिटे वाचणार आहे. यामुळे फास्ट बस सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 200 मार्गांवर या बसेस धावणार आहे.

हे सुद्धा वाचा

या मार्गांवर वातानुकूलित बसेस

सध्या पुणे महानगरपालिका ते भोसरीपर्यंत नॉन-स्टॉप बस सेवा सुरु आहे. आता त्यासाठी 200 मार्गांची निवड केली गेली आहे. या बस सुरु होण्यापूर्वी चालकच प्रवाशांना तिकीट देणार आहे. या सेवेत वातानुकूलित बसचा वापर केला जाणार आहे. परंतु त्यामुळे तिकिटांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. जलद आणि चांगली सेवा प्रवाशांना मिळात असल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करत आहे. नवीन मार्गांवर सुरु होणाऱ्या नॉन स्टॉप बसेसला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.