Pune rain : पुणे शहरात ऑगस्टमधल्या कमी पावसाची नोंद, हवामान विभागानं दिली सविस्तर आकडेवारी

पुणे शहरासाठी ऑगस्ट महिना हलक्या पावसाने संपण्याची शक्यता आहे. पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा नाही.

Pune rain : पुणे शहरात ऑगस्टमधल्या कमी पावसाची नोंद, हवामान विभागानं दिली सविस्तर आकडेवारी
पुणे पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 6:03 PM

पुणे : मान्सूनचा पाऊस (Monsoon rain) पुणे शहरात चांगला बरसला असला तरी महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे राहिल्याने ऑगस्टमध्ये (August) शहरात केवळ 153.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उरलेल्या दिवसांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या विश्रांतीमुळे मासिक पर्जन्यमानात कोणतीही लक्षणीय सुधारणा होणार नाही. जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडणारा महिना ऑगस्ट मानला जातो. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) सादर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑगस्ट हा शहरासाठी 2011नंतरचा सातवा सर्वात ओला महिना ठरला आहे. पुणे शहरात जूनमध्ये केवळ 35 मिमी पाऊस पडला होता, जो 2011नंतरचा दुसरा सर्वात कोरडा महिना होता. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार जून अखेरपर्यंत पुण्यात 110.9 मिमी पावसाची कमतरता होती.

14 जुलै रोजी झाला 24 तासांचा पाऊस

जुलैमध्ये पुण्यात 386.2 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे तो 2011नंतरचा सर्वात ओला महिना जुलै ठरला. यामुळे 84.2 मिमीने जास्त पाऊस झाला, असे आयएमडीने म्हटले आहे. आयएमडी नुसार, 1 जून ते 28 ऑगस्ट दरम्यान एकूण पाऊस 574.5 मिमी आहे. या हंगामातील सर्वाधिक 24 तासांचा पाऊस 14 जुलै रोजी 53.6 मिमी इतका नोंदवला गेला.

ऑगस्ट महिना हलक्या पावसाने संपण्याची शक्यता

आयएमडी पुणे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, की पुणे शहरासाठी ऑगस्ट महिना हलक्या पावसाने संपण्याची शक्यता आहे. पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा नाही.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात –

वर्ष – ऑगस्टमध्ये मासिक पाऊस (मिमीमध्ये)

  1. 2014 – 280.6
  2. 2020 – 255
  3. 2016 – 230.5
  4. 2019 – 209
  5. 2012 – 204.9
  6. 2017 – 162.2
  7. 2022 – 153.3
  8. 2006 (सर्व वेळ रेकॉर्ड) – 378

Non Stop LIVE Update
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.