AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : वॉशरुमला जाण्यासाठी महिलांकडून पत्र लिहून घ्यायचा, पुण्यात मॅनेजरला मनसे स्टाईलने दणका

पुण्यात वॉशरुमला जाण्यासाठी पत्र लिहून घेणाऱ्या प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल (MNS Style) दणका देण्यात आला आहे. मनसे माथाडील कामगारांनी (Mathadi Kamgar) या मॅनेजरच्या कानशिलात लगावत त्याला या प्रकरणी जाब विचारला आहे. तसेच, याप्रकरणी महिला पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत.

VIDEO : वॉशरुमला जाण्यासाठी महिलांकडून पत्र लिहून घ्यायचा, पुण्यात मॅनेजरला मनसे स्टाईलने दणका
Pune MNS
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 11:28 AM
Share

पुणे : पुण्यात वॉशरुमला जाण्यासाठी पत्र लिहून घेणाऱ्या प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल (MNS Style) दणका देण्यात आला आहे. मनसे माथाडील कामगारांनी (Mathadi Kamgar) या मॅनेजरच्या कानशिलात लगावत त्याला या प्रकरणी जाब विचारला आहे. तसेच, याप्रकरणी महिला पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील प्रभा इंजिनिअरिंग कंपनीत महिला कामगारांना मानसिक त्रास दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. येथे वॉशरुमला जाणाऱ्या महिलांकडून पत्र लिहून घेतलं जात होतं. हा गलिच्छ प्रकार घडवून आणणाऱ्या कंपनी मॅनेजरचा प्रताप कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला.

महिलांना कंपनीत गलिच्छ वागणूक देणाऱ्या कंपनी मॅनेजरला मनसे माथाडी कामगारांनी मनसे स्टाईलने जाब विचारला. मॅनेजरच्या केबिनमध्ये बसून या कामगारांनी त्याला जाब विचारला. या घटनेच्या 3 मिनिटे 42 सेकंदाच्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, 20-25 जण त्या मॅनेजरला घेराव घालून बसलेत. यामध्ये काही महिलाही दिसत आहेत. मधे  निळ्या रंगाचा शर्ट घातलेला कंपनीचा मॅनेजर उभा आहे.

माधाडी कामगार हे या मॅनेजरला याप्रकरणी प्रश्न विचारत त्याची खरडपट्टी काढताना दिसत आहेत. तसेच, संपातलेल्या कामगारांकडून मॅनेजरला शिवीगाळही करण्यात येत आहे. तर, मॅनेजर त्याच्यावर लावलेले आरोप फेटाळताना दिसत आहे. तेव्हा कामगार त्याला धमकी देताना दिसत आहेत. तू कंपनीच्या बाहेर कसा निघतो, अशी धमकी यावेळी मॅनेजरला देण्यात आली.

कामगाराने मॅनेजरच्या कानशिलात लगावली

जेव्हा मॅनेजरने त्याच्यावरील आरोप फेटाळले तेव्हा माधाडी कामगाराकडून त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आला. तसेच, एका कामगाराने मॅनेजरच्या दोन कानशिलातही लगावल्या. मात्र, इतर कामगारांनी त्याला थांबवले. यावेळी कंपनीचा एचआरही तिथे उपस्थित होता. कंपनी मॅनेजर मनसे स्टाईलने जाब विचारताच मॅनेजरने या प्रकाराची कबुली दिलीये. त्यानंतर कामगार आणि एचआर यांच्यात चर्चा झाली. यावेळी, मुळशी आमची मराठी माणसांची आहे. आम्ही तुमचं हे असं वागणं खपवून घेणार नाही, असा दमच या कामगारांनी एचआरला दिला.

हा सर्व गोंधळ तिथे उपस्थितांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये महिला कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

VIDEO: बापरे! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनचा अहवाल सात दिवसात येणार

Pimpari-Chinchwad | वाकडमध्ये गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकानं जळून खाक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.