वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद

71 वर्षीय महिला घरात एकटीच असताना 52 वर्षीय आरोपीने तिच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. (Pune Old Lady Murder Molestation)

वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद
आरोपी अनिल वाघमारे

पिंपरी चिंचवड : वयोवृद्ध महिलेची हत्या करुन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा घृणास्पद प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. चाकण पोलिसांनी शिताफीने अवघ्या 4 ते 5 तासांत आरोपीला जेरबंद केलं. अतिप्रसंग करताना प्रतिकार केल्यामुळे आरोपीने वृद्धेची आधी हत्या केली, त्यानंतर तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. (Pune Crime Chakan Old Lady Murder after resisting Molestation)

चुलीसमोरील लोखंडी फुकारीने मारले

पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील कुरकुंडी भागात सोमवार 24 मे रोजी ही घटना घडली. 71 वर्षीय महिला घरात एकटीच असताना 52 वर्षीय आरोपी अनिल वाघमारे तिच्या घरात घुसला. अनिलने वृद्धेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या डोक्यात घरात असलेल्या चुलीच्या समोरील लोखंडी फुकारीने मारले. गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. वृद्धा मृत्युमुखी पडल्यावर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला.

आरोपीला शोधण्यात श्वानाची मोलाची मदत

वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याची माहिती त्यांच्या सूनेकडून मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेची हत्या कोणी, का आणि कशाने केली, हे सुरुवातीला पोलिसांना समजत नव्हते. मात्र पोलिसांनी कुरकुंडी गाव पिंजून काढले आणि आरोपी अनिल वाघमारेला अटक केली. या गुन्ह्याच्या तपासात पुण्यातील श्वान पथकातील ‘जॅक’ श्वानाची मोलाची मदत झाली.

पुण्यात ब्लाऊजने गळा आवळून सासूचा खून

घरगुती वादातून सुनेने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आरोपी पूजा मिलिंद शिंदे हिचे सासू बेबी गौतम शिंदे सोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन वाद सुरु होते. त्याचाच राग मनात धरुन पूजा हिने ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून सासूचा खून केला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह तिने पोत्यात लपवला.

सूनेकडून हत्या, मुलाने पुरावे नष्ट केले

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भरलेलं पोतं तिने आधी टेरेसवर ठेवलं होतं. त्यानंतर सोसायटीतील एका बंगल्याशेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन तिने पोतं टाकून दिलं. मृतदेह टाकून आल्यानंतर टेरेस आणि सोसायटीच्या पायऱ्यांवर पडलेलं रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे याने धुवून-पुसून पुरावा नष्ट केला. पूजा मिलिंद शिंदे आणि मिलिंद गौतम शिंदे असे या प्रकरणातील आरोपी सून आणि मुलाचे नाव आहे. दोघांनाही पुण्यातील तळेगांव दाभाडे पोलिसांनी अटक केली.

संबंधित बातम्या :

एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

(Pune Crime Chakan Old Lady Murder after resisting Molestation)