पुणेकरांना दिलासा, पहिले ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटर सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील पहिल्या 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर'चे  ऑनलाईन उद्धाटन करण्यात आले. (Pune drive-in vaccination center)

पुणेकरांना दिलासा, पहिले 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सेंटर सुरु
फोटो प्रातनिधिक

पुणे : मुंबई पाठोपाठ पुण्यातही ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील पहिल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’चे  ऑनलाईन उद्धाटन करण्यात आले. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. त्यामुळे हडपसर परिसरात सुरु करण्यात आलेलं ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असे अजित पवार म्हणाले. (Pune drive-in vaccination center Inaugurate Deputy CM Ajit Pawar)

पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर

कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. त्यामुळे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर हे जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

पुण्यात लवकरच लसीचे उत्पादन 

राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस इत्यादींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही अजित पवार म्हणाले.

परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे येथेही लवकरच लसीचे उत्पादन सुरु होईल. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेबाबत बेसावध राहून चालणार नाही

पुणे शहरातील हडपसर येथे सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करतो. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थिती बेसावध राहून चालणार नाही. राज्य शासनानेही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे.

पावसाळ्यात कोरोनासोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सोईचे

पुण्यातील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सोईचे होईल. कोरोना संसर्गाचा यशस्वी मुकाबला करताना हे पुढचे पाऊल असल्याचा उल्लेख त्यांनी केला, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. (Pune drive-in vaccination center Inaugurate Deputy CM Ajit Pawar)

संबंधित बातम्या : 

VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

मोठी बातमी: पुण्यातील सरसकट सर्व दुकानं उघडण्यास परवानगी मिळणार?

Video | अंगणात पडली वीज, लोकांना विजेचे झटके, नारळाच्या झाडानेही पेट घेतला, घटना कॅमेऱ्यात कैद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI