AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD कडून महाराष्ट्रात पाच दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा, अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात

Weather Update : राज्यात अवकाळीचे संकट असणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

IMD कडून महाराष्ट्रात पाच दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा, अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात
| Updated on: Apr 30, 2023 | 9:23 AM
Share

पुणे : उन्हाळ्यात देशातील हवामानात (Weather Update) मोठा बदल झाला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.

काय आहे अंदाज

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. तर विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १, २ व ३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात १ मे रोजी गारपीट तर २ आणि ३ मे रोजी पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

मुंबईत पाऊस

विरार, वसई, नालासोपारामध्ये रविवारी पहाटेपासून अवकाळी पाऊस सुरु झाला. परिसरात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊसही होत आहे. सकाळपासून रिमझिम पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी ठीक-ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याची दृश्य पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगर,मुंबई शहरात आणि पश्चिम उपनगरामध्ये अवकाळी पावसाने ही हजेरी लावलेली आहे. 5 मे पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी त्याच सोबत मुंबईमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

अमरावतीत मुसळधार

अमरावतीच्या मेळघाटमध्ये मध्यरात्री तुफान पाऊस झाला. या पावसामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यावर धुक्याची चादर पसरली. पावसामुळे पहाटे चिखलदरातील रस्त्यांवर दाट धुके दिसून आले. अमरावती शहरासह जिल्हाभरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अमरावती शहरातील राजापेठ ते दस्तूर मार्गावर सात ते आठ वृक्ष उन्मळून पडले.

नांदेडमध्ये अवकाळीमुळे पूर

नांदेड जिल्ह्यात मागील 6 दिवसापासून सतत अवकाळी पाऊस बरसतोय.या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात छोट्या मोठ्या नाल्याना पूर आला आहे. हदगाव तालुक्यातील जांभळा गावात आज सकाळी ढगफुटी सदृश अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे असरा नाल्याला पूर आलाय. शेतातील उन्हाळी ज्वारी, वाळात घातलेली हळद आणि फळ बागांसह भाजी पाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.