Pune terrorist | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात धक्कादायक माहिती, दहशतवादी बनण्यासाठी यांनाही केले तयार

Nia pune isis module terrorist | पुणे पोलिसांच्या कस्टडीतून फरार झालेला इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. त्यानंतर या प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pune terrorist | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात धक्कादायक माहिती, दहशतवादी बनण्यासाठी यांनाही केले तयार
terrorist
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 11:34 AM

पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन आरोपींना 18 जुलै रोजी पकडले होते. एका मोटारसायकल चोरी प्रकरणात सापडलेले हे दोघे आरोपी दशतवादी निघाले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा फरार झाला होता. तेव्हापासून एनआयएकडून त्याचा शोध घेतला जात होता. त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले. दिल्ली पोलिसांना एक ऑक्टोंबर रोजी तो सापडला. त्याच्या आणि इतरांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे इसिस मॉड्यूलमध्ये महिलासुद्धा

पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात महिलांचाही सहभाग असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. अटक केलेले दहशतवादी मो. शाहनवाज आलम, मोहम्मद रिजवान अशरफ उर्फ मौलाना आणि मोहम्मद अरशद वारसी यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. इसिस मॉड्यूलमध्ये तीन महिला सहभागी आहे. त्यात फरार असलेला मो. रिजवान याची पत्नी अलफिया, मो. शाहनवाज याची पत्नी मरियम आणि बहिणीचा सहभाग आहे. त्या तिन्ही महिला फरार झाल्या आहेत.

काय होती महिलांची भूमिका

इसिसच्या दहशतवादी विचाराने तिन्ही महिला प्रेरीत झाल्या होत्या. तसेच दशतवादी घटनांचे समर्थन करत होत्या. आयएसआयने या महिलांना दहशतवादी बनवणे सुरु केले होते. या प्रकरणात फरार असलेला रिजवान त्याची बायको अलफिया, मरियन हे सर्व जण जामिया विद्यापीठात भेटत होते. अलफिया ही पदवीधर होती. पाकिस्तानत बसलेल्या हँडलरशी ती बोलत होती. आता दिल्ली उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, बिहार आणि केरळमध्ये त्यांचा शोध घेत आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपींचा असा होता कट

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक राज्यात गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट त्यांनी आखला होता. तसेच एखादा राजकीय नेता, उद्योगपती किंवा फिल्म स्टर यांना बॉम्बने उडवण्याची त्यांची योजना होती. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांना बॉम्बस्फोट घडवून आणायचा होता.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.