Pune Lockdown update : पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन उठवला, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तर पॉझिटिव्हिटी रेट अद्याप कमी झालेला नाही, असंही टोपे म्हणाले.

Pune Lockdown update : पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन उठवला, आरोग्यमंत्र्यांची घोषणा
राजेश टोपे, आरोग्यमंत्री


पुणे : पुणे विभागातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पुण्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अन्य एका बैठकीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिली. त्यावेळी पुण्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तर पॉझिटिव्हिटी रेट अद्याप कमी झालेला नाही, असंही टोपे म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे पुण्यातील विकेंड लॉकडाऊन उठवण्यात येत असल्याची घोषणाही टोपे यांनी यावेळी केली. (Rajesh Tope announces cancellation of weekend lockdown in Pune)

कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यात शनिवारी आणि रविवार फक्त दवाखाने आणि मेडिकल सोडून सर्वकाही बंद ठेवण्यात येत होतं. त्यात किराणा दुकानांसह भाजीपाला विक्रीचाही समावेश होता. मात्र, आता पुण्यातील स्थिती सुधारत आहे. त्यामुळे पुण्यात शनिवार आणि रविवारी सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, त्यासाठीही राज्य सरकारने घालून दिलेली सकाळी 7 ते 11 ही वेळ कायम राहणार असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

‘होम आयसोलेशन बंद झालं पाहिजे’

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग होणं गरजेचं आहे. हाय रिस्क आणि लो रिस्क अशा दोन्ही स्वरुपात ते व्हायला हवं. पुण्यातील टेस्टिंगचं प्रमाण नंबर एकवर आहे. आता होम आयसोलेशन कमी झालं पाहिजे. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची जास्त भरती होणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात याची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना टोपे यांनी यावेळी केल्या.

खासगी रुग्णालयाचं प्रत्येक बिल तपासलं जाणार

खासगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारणीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे. अशावेळी खासगी रुग्णालयाचं प्रत्येक बिल तपासलं जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयातील दीड लाखाचं बिल तपासलं जात होतं. मात्र, आता खासगी रुग्णालयाचे प्रत्येक बिल तपासलं जाईल, असं टोपे यांनी जाहीर केलंय.

15 दिवस लॉकडाऊन वाढवला

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केलीय. राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra lockdown update : लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवणार, 1 जूनला नवी नियमावली

राज्यात आणखी 15 दिवसाने लॉकडाऊन वाढणार; राजेश टोपे यांचे सुतोवाच

Rajesh Tope announces cancellation of weekend lockdown in Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI