AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown Update : पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात, दुकानांसाठी नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?

पुणे : मोठ्या गोंधळानंतर अखेर राज्य सरकारनं अनलॉकची नवी नियमावली जाहीर केलीय. राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले आहेत. या 5 टप्प्यानुसार राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार असून, सर्वकाही सुरु करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. […]

Pune Lockdown Update : पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात, दुकानांसाठी नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?
पुणे महापालिका
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 8:47 PM
Share

पुणे : मोठ्या गोंधळानंतर अखेर राज्य सरकारनं अनलॉकची नवी नियमावली जाहीर केलीय. राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले आहेत. या 5 टप्प्यानुसार राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार असून, सर्वकाही सुरु करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहे. (Pune City in third phase of Unlock)

पुण्यात या गोष्टी सुरु राहणार

1. हॉटेल, रेस्टोरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने 2. हॉटेल – शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा 3. लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी 4. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत 5. खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार )  दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता) 6. क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात 7. चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी 5 पर्यंत 8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 9. लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत 10. अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत 11. शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती 12. बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा 13. शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत 14. संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर 15. जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन 16. सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून 17. ई कॉमर्स – नियमित वेळेत 18. मला वाहतूक – नियमित वेळेत

पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे 

  • पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे
  • दुसर्‍या टप्प्यात 2  जिल्हे
  • तिसरा 15 जिल्हे
  • चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे

संबंधित बातम्या :

Maharashtra unlock 5 stage : मुंबई नेमकी कोणत्या टप्प्यात?

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

Pune City in third phase of Unlock

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.