AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : डॉक्टरांना धमकी देऊन खंडणी घेणारा सराईत पुण्यातल्या लोणी काळभोर पोलिसांच्या कचाट्यात!

लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिसांनी (Police) डॉक्टरांकडून पैसे उकळणाऱ्यास अटक (Arrest) केली आहे. परिसरातील दोन डॉक्टरांकडून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी एका 35 वर्षीय तरुणावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Pune crime : डॉक्टरांना धमकी देऊन खंडणी घेणारा सराईत पुण्यातल्या लोणी काळभोर पोलिसांच्या कचाट्यात!
प्रेमाच्या त्रिकोणात विटेने ठेचून मारलेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 16, 2022 | 12:22 PM
Share

पुणे : लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिसांनी (Police) डॉक्टरांकडून पैसे उकळणाऱ्यास अटक (Arrest) केली आहे. परिसरातील दोन डॉक्टरांकडून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी एका 35 वर्षीय तरुणावर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगेश माणिक कांचन असे आरोपीचे नाव असून तो उरुळी कांचन येथील रहिवासी आहे. त्याला नुकतीच त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डॉक्टरांना धमकी दिली, की ते बेकायदेशीर गर्भपात करत आहेत आणि त्यांच्यावर लिंग-केंद्रित गर्भधारणेचे निदान करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. या आरोपीस आता पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे

या आरोपीवर विमानतळ, हिंजवडी, दौंड, यवत आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, बलात्कार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे प्रभारी राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. पीडितांकडून खंडणी वसूल करताना सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी वाचा :

Ajit Pawar Kolhapur By Election 2022 : मुख्यमंत्र्यांनी बारकाईनं लक्ष दिलं, कोल्हापूर उत्तरच्या निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Pimpri Chinchwad crime : मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते म्हणून मोशीत तरुणाला दगडानं ठेचून मारलं!

Pune water problem : उकाड्यासह आता पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट, गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप

Follow Us
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?