100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेणं हा हेकेखोरपणा, पुणे विद्यापीठाविरोधात मनविसे आक्रमक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठातर्फे संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Pune MNS SPPU

100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेणं हा हेकेखोरपणा, पुणे विद्यापीठाविरोधात मनविसे आक्रमक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 6:49 PM

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठातर्फे संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील परीक्षा नियोजनास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला आहे. मनविसेने विद्यापीठानं 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनानं केली आहे. (Pune MNS student organization wrote letter to SPPU administration reduce syllabus for semester exam)

70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची मनविसेची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं विद्यापीठाच्या निर्णयावर टीका केली आहे. विज्ञान शाखा वगळता इतर अभ्यासक्रम पूर्ण नसतांना 100 % अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची ? असा सवाल मनसेने केला आहे. विद्यापीठानं 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

विद्यापीठाचं धोरण विद्यार्थी विरोधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत विद्यापीठाचे हे धोरण शिक्षण हित आणि विद्यार्थी हित न जपता हेकेखोर वृत्तीचे फलित असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलेला आहे. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यामुळे असणाऱ्या लॉकडाऊनचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर ही मोठ्या प्रमाणात झाला आहे, असं मनविसेनं म्हटलं आहे.

15 जूनापासून दुसऱ्या सत्राची परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. याबाबतचा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला.

संबंधित बातम्या:

दहावीच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णयानंतर कार्यवाही, पालकांमध्ये दोन मतप्रवाह: दिनकर पाटील

दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर

(Pune MNS student organization wrote letter to SPPU administration reduce syllabus for semester exam)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.