PMC Election ward 14 Pashan | पाषाण बावधन बुद्रुक परिसरात कमळाचं वर्चस्व, यंदा घड्याळाचा आकडा पुढे सरकणार का?

पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकूण लोकसंख्या 58 हजार 515 एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 7801 तर अनुसूचित जमातींची संख्या 1669 एवढी आहे.

PMC Election ward 14 Pashan | पाषाण बावधन बुद्रुक परिसरात कमळाचं वर्चस्व, यंदा घड्याळाचा आकडा पुढे सरकणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 7:07 PM

पुणेः राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकीचा (Municipal Corporation) बिगुल वाजला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात मुंबई, पुण्यासह इतर महत्त्वाच्या शहरांतील मनपा निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, यंदा बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जात आहे. पुण्यातदेखील (Pune Municipal Corporation) नवी प्रभाग रचना जाहीर झाली असून त्यानुसार, इच्छूक उमेदवार (Corporator Candidate) कामाला लागले आहेत. यंदा लोकसंख्येचं गणित आणि बहुसदस्यीय रचनेमुळे वॉर्डच्या रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. त्यामुळे विविध पक्षांनाही आपल्या प्रभावाखालील वॉर्ड सांभाळण्याचं आव्हान आहे. पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाषाण बावधन बुद्रुक परिसर येतो.

लोकसंख्येचं गणित काय?

पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकूण लोकसंख्या 58 हजार 515 एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 7801 तर अनुसूचित जमातींची संख्या 1669 एवढी आहे.

प्रभाग 14 मधील 2017मधील विजयी उमेदवार कोण?

– स्वाती अशोक लोखंडे- भाजप – निलिमा दत्तात्रय खाडे- भाजप – जोत्स्ना गजानन एकबोटे- भाजप

प्रभाग 14 वॉर्ड अ- 2017 चं गणित काय?

या वॉर्डात 2017 मध्ये भाजपच्या स्वाती अशोख लोखंडे यांनी विजय खेचून आणला होता. स्वाती लोखंडे यांना 16,817 मते पडली. तर राष्ट्रवादीचे प्रशांत सावंत यांना 7115, शिवसेनेचे अरविंद कांबेळे यांना 5954, काँग्रेसचे नारायण सोमा पाटोळे यांना 5796 मते पडली.

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
स्वाती अशोक लोखंडे भाजपविजयी उमेदवार
प्रशांत सावंतराष्ट्रवादी-
प्रशांत सावंतशिवसेना-
सीमा पाटोळेकाँग्रेस-
---
---

प्रभाग 14 वॉर्ड ब- 2017 चं गणित काय?

या वॉर्डात भाजपच्या निलिमा दत्तात्रय खाडे यांचा विजय झाला होता. तर मनसेच्या सोनम कुसाळकर यांना 1676, शिवसेनेच्या नीता आनंद मजाळकर यांना 10,869, काँग्रेसच्या मयुरी शिंदे यांना 6216 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमोद पवार यांना 4655 एवढी मते पडली होती.

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
निलिमा दत्तात्रय खाडेभाजपाविजयी उमेदवार
सोनम कुसाळकरमनसे-
नीता आनंद मजाळकरशिवसेना-
मयुरी शिंदेकाँग्रेस-
प्रमोद पवारराष्ट्रवादी-
अपक्ष--

प्रभाग 14 वॉर्ड क- 2017 चं गणित काय?

या वॉर्डात भाजपच्या जोत्स्ना एकबोटे यांचा विजय झाला होता. त्यांना 17599 मते मिळाली होती. काँग्रेसच्या आयशा सय्यद यांना 6945, राष्ट्रवादीच्या हेमलता उदय महाले यांना 7497 मते तर मनसेच्या विनया दळवी यांना 1956 मते मिळाली होती. शिवसेनेच्या अमिता शिरोळे यांना 7361 एवढी मते मिळाली.

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
जोत्स्ना एकबोटेभाजपाविजयी उमेदवार
आयशा सय्यद काँग्रेस-
हेमलता उदय महालेराष्ट्रवादी-
विनया दळवी मनसे-
अमिता शिरोळेशिवसेने-
अपक्ष--

प्रभाग 14 वॉर्ड ड- 2017 चं गणित काय?

डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनी या भागावरही कमळाची सत्ता आहे. इथे अनिल शिरोळे या भाजपच्या नगरसेवकाला 2017 मध्ये 13,393 मते पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक काळुराम बोडके यांना 8466 मते पडली. तर काँग्रेसच्या अलगुडे मुकारी शेट्टी यांना 7215 अशी मते पडली. मनसेच्या चैतन्य दीक्षित यांना 863 तर शिवसेनेच्या दत्तात्रय रामचंद्र पवार यांना 7649 एवढी मते मिळाली.

उमेदवारपक्ष विजयी/आघाडी
अनिल शिरोळेभाजपविजयी उमेदवार
दीपक काळुराम बोडकेराष्ट्रवादी काँग्रेस-
अलगुडे मुकारी शेट्टीकाँग्रेस-
चैतन्य दीक्षित मनसे-
दत्तात्रय रामचंद्र पवारशिवसेना-
Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.