AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळेंनी 3 ओळीत भाजपला सुनावलं

NCP Leader Supriya Sule on Jayant Patil : राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंप?; पक्षफुटीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचं तीन ओळीत उत्तर, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पक्षांतरवर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. कायदा आणि सुव्यवस्थेवरही त्यांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर...

जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळेंनी 3 ओळीत भाजपला सुनावलं
| Updated on: Feb 19, 2024 | 1:03 PM
Share

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही महाविकास आघाडीला धक्के देणाऱ्या घटना घडल्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. त्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असलेला नेता म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. 100 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडेचे लोकं त्यांना हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नेत्यांच्या पक्षांतरावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

उन्हाळा वाढत चालला आहे. 8 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने यूपीआय विरोधात व्हाईट पेपर काढले. निशिकांत दुबे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आरोप केले की आदर्श घोटाळ्यात काही गोष्टी आहेत. आदर्श घोटाळा अशोक चव्हाण यांनी केला मी नाही बोलत पण हे भाजप बोलते. भाजपचे भ्रष्टाचार जुम्ला पार्टी हे मॉडेल तयार झालं आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपमध्ये जातो, असं म्हणत महाविकास आघाडीसोडून महायुतीत जाण्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्रालयाचे ऑडिट करा- सुळे

कायदा आणि सुव्यवस्था बद्दल पण मी अनेक वेळा बोलली आहे. मी अमित शाह यांच्याशी सुद्धा सांगितलं आहे. पुणे नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांना विनंती की गृहमंत्रालयाचे ऑडिट करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.