AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishor Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणात एसआयटी प्रमुखांच्या बदलीबाबत मोठा निर्णय

Kishor Aware Murder : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या प्रकरणी आरोपींना अटक झाली तरी मुख्य सूत्रधार फरार आहे. त्यातच तपास अधिकारी प्रेरणा कट्टे यांची बदली झाली होती.

Kishor Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणात एसआयटी प्रमुखांच्या बदलीबाबत मोठा निर्णय
Kishor Aware
| Updated on: May 25, 2023 | 9:57 AM
Share

पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची नुकतीच हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना पकडले होते. त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोलीस पोहचले. आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात माजी नगरसेवक गौरव खळदे असल्याचे समोर आले होते.  या प्रकरणात तपासासाठी एसआयटीची निर्मिती केली होती. त्याचे प्रमुख सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली झाली होती. त्यांची चंद्रपूर येथे बदली झाली.

शासनाने काय घेतला निर्णय

राज्यातील उपअधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. त्यात पिंपरी चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा समावेश होता. त्यामुळे किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार? याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूरला झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास त्यांच्यांकडे राहणार आहे. यामुळे या तपासाचा वेग कायम राहणार आहे. या प्रकरणातील फरार आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे याला अटक करण्यासाठी पोलीस वेगाने प्रयत्न करणार आहे.

यांच्या झाल्या होत्या बदल्या

गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस (Pimpri) उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली. तर वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली झाली. तसेच चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली करण्यात आली होती. मात्र नव्या आदेशामध्ये कट्टे यांची बदली रद्द करण्यात आली आहे.

हत्येसाठी असे झाले होते डिलिंग

पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली हे आता समोर आलंय. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाणार होता. माजी नगरसेवक भानू खळदेंचं बिंग आरोपींनी फोडलं. तसेच गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने दहा लाख रुपये दिलेत, हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून देण्यात आलेत.

…तर ५० लाखांपर्यंत गेली असती सुपारी

या प्रकरणी खळदे बाप लेकाचे नाव समोर आलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे झालं असतं तर साधारण चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात हा सुपारीचा आकडा पोहचला असता. भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळं मुलगा गौरवसह भानू खळदे ही जानेवारीपासून या कटात सहभागी असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आलंय. त्यामुळेच भानू खळदेला ही आरोपी बनविण्यात आलं असून त्यांचा शोध सुरु आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.