AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : ‘सिया’ने पुण्यातील पोलिस पाटलाला लावला 56 लाखांचा चुना, पुण्यात काय घडलं ?

मुळशीतील एका पोलिस पाटलाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 'सिया' नावाच्या महिलेने ५६ लाखांची फसवणूक केली. बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाली. सुरुवातीला १० कोटींचा नफा दिसला, पण पैसे काढताना ३० लाखांची अधिक मागणी झाली. आता पौड पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Pune Crime : 'सिया’ने पुण्यातील पोलिस पाटलाला लावला 56 लाखांचा चुना, पुण्यात काय घडलं ?
पुण्यात 'सिया'कडून पोलिसाची फसवणूक
| Updated on: Jul 29, 2026 | 12:41 PM
Share

पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या नावाची चर्चा देशभर सुरू आहे. मात्र याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातून ‘सिया’ नावाच्या आणखी एका कथित महिलेकडून आर्तिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चक्क एका पोलिसाची 56 लाखांची फसवणूक करण्यात आली असा आरोप आहे. “सिया” चा हाँ कारनामा समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. मुळशी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस पाटलाने या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 56 लाखांचा गंडा घातल्याच्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

संबंधित पोलिसाच्या तक्ररीनुसार, नोव्हेबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी तक्रारदाराकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवून घेतली. मात्र, प्रत्यक्षात या गुंतवणुकीतून कोणताही परतावा मिळाला नाही आणि गुंतवलेली मूळ रक्कमही परत करता आली नाही, असा आरोप आहे.

सोशल मीडियावरील जाहिरातीने फसवणुकीची सुरुवात

या संपूर्ण प्रकाराची सुरुवात सोशल मीडियावर दिसलेल्या एका आकर्षक जाहिरातीपासून झाली. ही जाहिरात एका नामांकित ब्रोकरेज कंपनीशी संबंधित असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. शेअर बाजारात कमी जोखमीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन या जाहिरातीत देण्यात आलं होतं. तक्रारदाराने जाहिरातीवर क्लिक केलं, त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवरील एका गुंतवणूकविषयक ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आलं. या ग्रुपमध्ये शेअर बाजार, आयपीओ आणि ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवण्याबाबत सतत माहिती दिली जात होती.

‘सिया’ नावाच्या महिलेने साधला संपर्क

ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘सिया’ नावाच्या एका महिलेने तक्रारदार इसमाशी संपर्क साधला. आपण स्वतः शेअर बाजारातील तज्ज्ञ आहोत, असं सांगत त्या सियाने गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला एका बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर केला होता. या ॲपमध्ये सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर मोठा नफा झाला, असं खोटं चित्र दाखवण्यात आलं. त्यामुळे तक्रारदाराला हे व्यवहार खरे असल्याचा विश्वास वाटला. एवढंच नव्हे तर त्यांना सवलतीच्या दरात आयपीओ शेअर्स मिळतील, तसेच विशेष गुंतवणूक योजनांमधून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिषही दाखवण्यात आलं. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने वेळोवेळी बरीच मोठी रक्कम जमा केली.

ॲपमध्ये दिसला 10 कोटींचा बनावट नफा

तक्रारदाराने जसजशी अधिक गुंतवणूक केली, तसतसे संबंधित ट्रेडिंग ॲपच्या डॅशबोर्डवर त्यांच्या खात्याचे मूल्य वाढत असल्याचे दिसत होतं. काही काळानंतर या बनावट ॲपमध्ये त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य तब्बल 10 कोटी रुपये झाल्याचे दाखवण्यात आलं. इतकी मोठी रक्कम मिळणार या विश्वासाने तक्रारदाराने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना प्रत्यक्षात कोणतीही रक्कम मिळाली नाही.

पैसे काढण्यासाठी पुन्हा 30 लाखांची मागणी

त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी नवीन कारण पुढे केलं. कथित नफा आणि गुंतवणुकीची रक्कम सोडवण्यासाठी आणखी 30 लाख रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून जमा करावे लागतील, अशी मागणी आरोपींनी केली . मात्र, आधीच मोठी रक्कम गुंतवूनही पैसे परत मिळत नसल्याने तक्रारदाराने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला आणि गुंतवलेली 56 लाखांची रक्कमही परत केली नाही.

पोलिसांकडून तपास सुरू

आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रादार इसमाने पौड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘सिया’ नावाच्या महिलेबरोबरच तिच्या इतर अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, बनावट ट्रेडिंग ॲप, सोशल मीडिया जाहिरात, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार