ये वाचवा… वाचवा… वाचवा…; ड्रायव्हरने बस थांबवली नाही तर भावाने जीवाच्या आकांताने टाहोच फोडला; व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल…

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Oct 16, 2022 | 10:05 AM

हा 1.22 मिनिटाचा व्हिडीओ आहे. बसमधील प्रवाशांनीच हा व्हिडीओ शूट केला आणि व्हायरल केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड ट्रेंडिंग करतोय.

ये वाचवा... वाचवा... वाचवा...; ड्रायव्हरने बस थांबवली नाही तर भावाने जीवाच्या आकांताने टाहोच फोडला; व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल...
ड्रायव्हरने बस थांबवली नाही तर भावाने जीवाच्या आकांताने टाहोच फोडला
Image Credit source: tv9 marathi

पुणे: पुण्यात कधी काय घडेल आणि पुणेकर (pune) कधी काय करतील हे सांगता येत नाही. काल पुण्यात असाच एक किस्सा घडला आहे. एका प्रवाशाला बसमधून उतरायचं होतं. पण भावाचा स्टॉप (bus stop) काही आलेला नव्हता. पण तरीही त्याला उतरायचं होतं. मात्र, स्टॉप न आल्याने ड्रायव्हरने (driver) बस थांबवण्यास मनाई केली. तेव्हा या भावाने, असा काही बनाव केला की बसमधील प्रवाशीच काय, बसबाहेरील लोकही अवाक् झाले. बस थांबवली नाही म्हणून त्याने ड्रायव्हरच्या केबिनमध्ये येऊन जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. ये वाचवा… वाचवा… वाचवा… असा टाहोच त्याने फोडला. नंतर जे घडलं त्याने तर सर्वच थक्क झाले.

बसमध्ये एक गोष्ट नेहमीच घडते. ती म्हणजे अनेकदा प्रवासी कधीच आपल्या स्टॉपवर उतरत नाहीत. प्रवासी नेहमीच आपल्या सोयीच्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करत असतात. बस स्टॉप येवो न येवो त्यांना काहीच फरक पडत नसतो. ते आपल्याला जिथे उतरायचं तिथेच गाडी थांबववण्याचा आग्रह ड्रायव्हरला धरत असतात. त्यामुळे बस चालक आणि प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमकही उडते. पुण्यातही काल असाच काही प्रकार घडला.

एका प्रवाशाला बस स्टॉपच्या आधीच उतरायचं होतं. त्याने बस चालकाला बस थांबवण्याची विनंतीही केली. पण बस चालकाने त्याचं ऐकलं नाही. त्यांनी आपली बस सुरूच ठेवली. त्यामुळे या प्रवाशाने शक्कल लढवली. त्याने वाचवा वाचवा करत जोरजोरात ओरडायला सुरुवात केली.

तो जिवाच्या आकांताने ओरडत होता. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये येऊन वाचवा रे… ये वाचवा… असा तो बोंबलत होता. जणू काही ड्रायव्हरनेच त्याला किडनॅप केलंय, असा बनाव करत तो ओरडत होता. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ही घटना घडलीय पुण्यात. पुणे परिवहनची ही बस चिंचवडहून बालेवाडीला जात होती. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला स्टॉपच्या आधी उतरायचं होतं. पण बस ड्रायव्हरने त्याला नकार दिला. बस स्टॉपवरच थांबेल असं ड्रायव्हरने त्याला सांगितलं.

ओ मास्तर मला उतरू दे. चिंचवड गावात बस चढली होती. त्यामुळे उतरू द्या… असं तो म्हणाले. ड्रायव्हरने त्याला बस थांबवण्यास मनाई केली. तेव्हा त्याने ड्रायव्हरच्या केबिनमधील बटनं दाबायला सुरुवात केली.

ड्रायव्हर बस थांबवणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने कांगावा सुरू केला. त्याने ओरडायला सुरुवात केली. ये वाचवा… ये वाचवा… ड्रायव्हर राग देतोय… वाचवा….उतरु देत नाय… वाचवा… ओ वाचवा रे…. ड्रायव्हर किडनॅप करतोय…. असं जोरजोरात बोलायला सुरुवात केली… त्यानंतर त्याने बोंब मारायला सुरवात केली. त्यामुळे गाडीच्या समोर थांबलेले लोकही गाडी थांबवून हे पाहायला लागले. त्यावर तो लोकांनाही ड्रायव्हर उतरू देत नाही असं सांगताना दिसतोय.

हे सुद्धा वाचा

हा 1.22 मिनिटाचा व्हिडीओ आहे. बसमधील प्रवाशांनीच हा व्हिडीओ शूट केला आणि व्हायरल केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड ट्रेंडिंग करतोय. मात्र, नेटकरी या तरुणालाच जास्त झापताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI