Pune Police : ‘गुड टच-बॅड टच’विषयी जागृती, पुणे पोलिसांनी घेतली बाल लैंगिक शोषणासंदर्भातली संवेदना कार्यशाळा!

या कार्यशाळेत शाळकरी मुलांचे लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यातील तरतुदी, तंबाखू, दारू आणि ड्रग्ज यांसारख्या पदार्थांबाबत जनजागृती करणे आणि मुलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था या विषयांवर सत्रांचा समावेश होता.

Pune Police : 'गुड टच-बॅड टच'विषयी जागृती, पुणे पोलिसांनी घेतली बाल लैंगिक शोषणासंदर्भातली संवेदना कार्यशाळा!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 3:53 PM

पुणे : बाल लैंगिक शोषणाच्या (Child sexual abuse) संदर्भात पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सुमारे 900 शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. मुलांचे लैंगिक शोषण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाच्या तरतुदी या विषयांवर ही कार्यशाळा आयोजित केली होती. पुणे शहर पोलिसांच्या (Pune city police) वतीने शनिवारी ही कार्यशाळा झाली. यावेळी पुणे आणि परिसरातील सुमारे 900 शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती सदस्य सहभागी झाले. मुलांचे लैंगिक शोषण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाच्या तरतुदी, पोक्सो कायदा (POCSO act) आणि ‘गुड टच-बॅड टच’ या विषयांवर कार्यशाळेत चर्चा झाली. पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्नील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सहभागी झाले होते.

‘विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची’

माध्यमिक शालेय शिक्षण विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची संघटना आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले, की अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे पालक, शाळेचे अधिकारी, शिक्षक, समुपदेशक आणि पोलीस यांचा समावेश असलेल्या प्रत्येक भागधारकाची मुलांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी कशी महत्त्वाची भूमिका आहे, हे अधोरेखित झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की कार्यशाळेने सर्व भागधारक आणि मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि सामायिकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.

हे सुद्धा वाचा

जनजागृती हा उद्देश

या कार्यशाळेत शाळकरी मुलांचे लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यातील तरतुदी, तंबाखू, दारू आणि ड्रग्ज यांसारख्या पदार्थांबाबत जनजागृती करणे आणि मुलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था या विषयांवर सत्रांचा समावेश होता. ‘गुड टच-बॅड टच’ या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मुलांसाठी पोलीस कार्यशाळा आयोजित करत आहेत. याठिकाणी वर्तन, लैंगिकता, लैंगिक समस्या आणि लैंगिक अत्याचाराशी संबंधित पैलूंबद्दल संवेदनशील केले जाते. या कामांसाठी पोलीस वर्तणूक तज्ज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतात.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.