पुण्यात खडसेंच्या जावयाच्या रेव्ह पार्टीत काय काय सापडले? सर्व माहिती समोर
पुण्यातील खराडी येथील एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावया प्रांजल खेवलकर यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू आणि हुक्का सापडला आहे.

पुण्यात एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या पार्टीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचे सेवन सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या रेव्ह पार्टीवरील छापेमारीत काय काय जप्त करण्यात आले, याबद्दलची माहिती आता समोर आली.
पुणे पोलिसांनी पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या हडपसर येथील निवासस्थानी ही पार्टी सुरु होती. यावेळी मध्यरात्री उशिरा पुणे पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह, काही हार्ड डिस्क सापडले आहेत. त्यासोबतच काही महत्त्वाची कागदपत्रंही सापडल्याचे बोललं जात आहे.
पुण्यात रुमचेही बुकींग
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका हॉटेलमध्ये रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 प्रांजल खेवलकर यांच्या नावाने 25 ते 28 जुलै या कालावधीसाठी बुक करण्यात आल्या होत्या. या रूमचे भाडे 10 हजार 357 रुपये होते. एका रूमचे बुकिंग 25 ते 28 जुलै तर दुसऱ्या रूमचे बुकिंग 26 ते 27 जुलैपर्यंत करण्यात आले होते.
एकनाथ खडसेंच्या जावयाच्या नावाने बुकींग
या रेव्ह पार्टीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाने केले होते. आता रूम बुकिंगच्या पावत्या समोर आल्याने हे स्पष्ट झाले आहे की, रूम बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने करण्यात आले होते आणि त्याचे पैसेही देण्यात आले होते, असा आरोप केला जात आहे.
छापेमारीत काय काय सापडले?
पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टीवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. या छापेमारीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हुक्का, दारू आणि अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच या ठिकाणी एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह, काही हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्र सापडली आहेत. या धाडसत्राने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
