पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा, पाहा वर्षभरात किती कोटींचा झाला दंड

पुणे शहरात वाहतूक पोलिसांप्रमाणे उपप्रादेशक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे. गेल्या वर्षभरात वीस हजार वाहनांवर आरटीओने कारवाई केली आहे. नियम न पाळणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवर आरटीओ कडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे

पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा, पाहा वर्षभरात किती कोटींचा झाला दंड
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:54 AM

अभिजित पोते, पुणे : रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong side) आणि एकेरी वाहन चालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार वाहनचालकांची संख्या पुणे शहरात वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून (Traffic police Report) ही बाब समोर आली आहे. वाहतूक पोलिसांप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही (आरटीओ) वाहन धारकांवर कारवाई केली जात आहे. नियम तोडणाऱ्यांना दंड होतो, मेमो दिला गेला आहे. यामुळे हजारो पुणेकरांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे नियम पाळा, अन्यथा दंडाला समोरे जाण्यासाठी तयार रहा, असा संकेतच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.

किती जणांवर झाली कारवाई

पुणे शहरात गेल्या वर्षभरात वीस हजार वाहनांवर आरटीओची कारवाई केली आहे. नियम न पाळणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवर आरटीओ कडून दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून वर्षभरात शहरात १५ कोटी रुपयांच्या दंडाची वसुली झाली आहे. पुणे शहर आरटीओकडून शहरात वायुवेग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने ही कारवाई केली आहे. पुणे शहरातच नाही तर पुणे शहराच्या बाहेरील मार्गावर वायुवेग पथकाची करडी नजर आहे. यामुळेच वायुवेग पथकाकडून वर्षभरात वीस हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर

पुणे शहरात वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे. शहरातील चौका- चौकात पुणे वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अगदी पुणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त देखील ॲक्टीव्ह मोडवर आले आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरात 795 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर वाहतूक पोलिसांची नजर असणार आहे. वाहतूक पोलिसांच्या रडावर पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील आणि पत्रकार देखील आले आहेत. त्यांच्यांकडूनही वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला आहे.

हे ही वाचा

नियम तोडून ओळखीने सुटणारेच पुणे वाहतूक पोलिसांच्या रडारवर

पोलिसांचा मनस्ताप वाढला, वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहन चालकाची नवी युक्ती

Non Stop LIVE Update
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.