सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला काही दिवसांसाठी टाळं, 30 एप्रिलपर्यंत सर्व विभाग बंद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. (pune savitribai phule university corona patient)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला काही दिवसांसाठी टाळं, 30 एप्रिलपर्यंत सर्व विभाग बंद
PUNE UNIVERSITY
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 6:07 PM

पुणे : पुण्यात कोरोना महामारीमुळे परिस्थिती चिंताजनक आहे. येथे रोज हजारोच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना विद्यापीठानं दिल्या आहेत. (Pune Savitribai Phule University decided to close all department upto 30 April due to increase in Corona patient)

सर्व शैक्षणिक विभाग बंद

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे येथे परिस्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सीजन, रेमेडीसीव्हीरसारख्या औषधांचा तुटवडा येथे मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात पुण्यात कोरोनास्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व गोष्टींचा आढवा घेऊन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आगामी 30 एप्रिलपर्यंत विद्यापीठ बंद असणार आहे. तसेच या काळात सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्याता आल्या आहेत. तसेच सध्या विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्यामुळे फक्त परीक्षा विभागातील कर्मचारी 50 टक्के क्षमतेने काम करतील असेसुद्धा सांगण्यात आले आहे.

विद्यापीठात कोणीही येऊ नये

विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय आजपासून (15 एप्रिल) लागू होणार आहे. या निर्णयाअंतर्गत विद्यापीठातील सर्व विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात कोणाीही विद्यापीठात न येण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

30 हजार अँटिजन टेस्ट किट प्राप्त

पुण्यात कोरोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग विभाग तसेच पुणे प्रशासनाकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पुणे जिल्हा प्रशासनाला 30 हजार अँटिजन टेस्ट किट प्राप्त झाल्या आहेत. पुढील 3 दिवसांत ग्रामीण भागात कोरोना चाचण्या करण्यासाठी हे किट मागवण्यात आले होते. जिल्ह्यातील 234 हॉटस्पॉटमध्ये या चाचण्या केल्या जाणार आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोना स्थिती अधित चिंताजनक बनत चालली आहे. अशावेळी ट्रेसिंग आणि टेस्टिंगची गती वाढवण्यासाठी प्रशासनानं या किट मागवल्या होत्या, तशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

 ससून रुग्णालयात आणखी 300 बेड  

ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून 300 बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ससूनमधील कोरोना रुग्णांसाठीच्या बेड्सची संख्या 500 वरुन 800 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर बातम्या :

LIVE | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल

Corona Cases and Lockdown News LIVE : अमरावतीत पुन्हा कोरोनाचा कहर सुरु, दिवसभरात तब्बल 534 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

(Pune Savitribai Phule University decided to close all department upto 30 April due to increase in Corona patient)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.