Pune :पुण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अजित पवार यांची ग्वाही

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

Pune :पुण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अजित पवार यांची ग्वाही
पुण्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:56 PM

पुणे – पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात ( budget)भरीव तरतूद करण्यात आली आहे.   पुण्याचा सर्वांगिण विकास (Development of Pune) करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली  जाणार नाही. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, सार्वजनिक आरोग्य, मुनष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करुन मानवी जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिली आहे.

आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने रुग्णालयांची उभारणी करण्यात येत असून या रुग्णालयांच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधामध्ये गुणवत्तापूर्ण भर पडण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिेकांना परवडणाऱ्या दरात घरे, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यात येणार आहे. विकासकामे करताना ती उत्तम दर्जाची व्हावीत आणि त्यात पारदर्शकता असावी असा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत.

या मार्गावर मेट्रो विस्तारणार

सुशिक्षित युवक-युवतींच्या कौशल्यात वाढ करुन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रत्येक महसुली विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, बाबूराव चांदेरे, हाजी अब्दुल गफूर पठाण, प्रकाश कदम, नगरसेविका परवीन शेख आदी उपस्थित होते.

विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सूस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामाचे, वारजे माळवाडी येथील क्रीडा संकुल व क्लब हाऊसचे, शिवणे येथील शिवणे-नांदेड पूल, सुखसागर नगर येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम क्रीडा संकुल, पोलीस चौकी, राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय महिला बचत गट सभागृह, कै. किसनराव कदम उद्यान, महादेवनगर येथील 70  लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची टाकीचे, मिठानगर, कोंढवा खुर्द येथे माँ खदीजा  प्रसुतिगृह, हजरत अब्दुल रहेमान  ओटा मार्केटसह विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्धाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.

मला गोवण्याचा मनसुबा पूर्ण होणार नाही- देवेंद्र फडणवीस

Pune metro : पुण्यात ‘या’ मेट्रो स्थानकांवर पीएमपीची सेवा; मेट्रो ॲपवरून तिकीट बुक करता येणार

‘देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला, असे अनेक शस्त्र पुढे बाहेर निघतील’, चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.