Pune Lockdown Updates | पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार, कोणकोणते निर्बंध लागण्याची शक्यता?

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहेत. (Pune Lockdown Ajit Pawar meeting)

Pune Lockdown Updates | पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार, कोणकोणते निर्बंध लागण्याची शक्यता?
Lockdown
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 11:18 AM

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार (Pune Lockdown Updates) आहे. पुण्यातील आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटने विभागीय आयुक्त कार्यालयाला बुधवारी सुधारित अहवाल दिला. निर्बंध कठोर करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. (Pune under thereat of Lockdown Ajit Pawar to take meeting)

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या प्रशासनासोबत बैठक घेणार आहेत. उद्याच्या बैठकीत पुण्यात निर्बंध लागण्याची शक्यता आहे. आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटने विभागीय आयुक्तांना दिलेल्या अहवालात याविषयी सुचवण्यात आलं आहे.

आयसर आणि टाटाच्या अहवालात कोणकोणत्या सूचना?

– अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, चित्रपटगृहे बंद करावीत

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करावी

– शक्य असलेल्या क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरु करावे

– सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा संमेलनाला स्थगिती द्यावी

पुणे शहरात नाईट कर्फ्यू

पुण्यात वर्ष उलटत असतांना कोरोनाची परिस्थिती हादरून टाकणारी आहे. त्यामुळे शहरात नाईट कर्फ्यु लावण्यात आलाय. शाळा महाविद्यालय बंद करण्यात आलीत. येत्या शुक्रवारी या निर्बंधांमध्ये अधिक वाढ होण्याची किंवा लॉकडाऊन होण्याचीही शक्यता आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केलंय. (Pune under thereat of Lockdown Ajit Pawar to take meeting)

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून वर्षपूर्ती

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. या घटनेला मंगळवारी (9 मार्च 2021) एक वर्ष झालं. जवळपास 10 महिने पुणे हे कोरोनाचा हॉटस्पॉट असलेलं शहर होतं. मागच्या महिन्यात संसर्ग कमी होत असताना पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं, अन पुणे शहर परत लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे.

पुण्यात कोरोनाची सद्यस्थिती काय?

राज्यातील आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण दुबईहून पुण्यात आला होता. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल 9 हजार 316 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात 4 लाख 20 हजार 877 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी 3 लाख 97 हजार 588 जण कोरोना मुक्त झालेत. आजच्या दिवशी (9 मार्च) पुणे जिल्ह्यात 1 हजार 412 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण

मुंबईत काळजी वाढली, 90 टक्के रुग्ण रहिवासी इमारतींत, कोरोनासंबंधी संपूर्ण नियमावली एका क्लिकवर

(Pune under thereat of Lockdown Ajit Pawar to take meeting)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.