पुणेकरांच्या पाण्याचा वाद मिटता मिटेना ; पुणे महापालिकेच्या बेमाप पाणीवापरा विरुद्ध शेतकऱ्याची एमडब्ल्यूआरआरकडे याचिका; काय आहे प्रकरण?

पुणेकरांच्या पाण्याचा वाद मिटता मिटेना ; पुणे महापालिकेच्या बेमाप पाणीवापरा विरुद्ध शेतकऱ्याची एमडब्ल्यूआरआरकडे याचिका; काय आहे प्रकरण?
pune khadakwasla dam

प्राधिकरणाच्या आदेशाला खो देत महापालिका नमूद केल्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिका जजलसंपदा प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न करून अवमान करत असल्याचे निदर्शनास आणून देत जराड यांनी प्राधिकरणात पुन्हा अवमान याचिका दाखल केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 25, 2022 | 1:21 PM

पुणे – पुणेकर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत  मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद अद्यापही मिटलेला नाही. पुणे महानगरपालिका(PMC) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने(Maharashtra Water Resources Regulatory Authority) घालून दिलेले आदेश डावलून पाण्याचा अतिरिक्त वापर करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याबाबत पुन्हा एका शेतकऱ्याने(Farmer) प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या 4 फेब्रुवारी सुनावणी होणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

खडकवासला धरणातून पुणे महापालिका नियमापेक्षा पाणी वापरत असल्यावरून बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी महापालिकेच्या विरोधात प्राधिकरणाकडे 24 जानेवारी 2017 रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर याचिकेवर सहा सुनावण्या झाल्यानंतर 2  नोव्हेंबर 2017  रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी पुणे महापालिकेने लोकसंख्येनुसार पाणी वापर करावा आणि जलसंपत्ती प्राधिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले होते. प्राधिकरणाने महापालिकेला विशिष्ट अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वापरण्याचे आदेश दिले होते. मात्र प्राधिकरणाच्या आदेशाला खो देत महापालिका नमूद केल्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिका जजलसंपदा प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न करून अवमान करत असल्याचे निदर्शनास आणून देत जराड यांनी प्राधिकरणात पुन्हा अवमान याचिका दाखल केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार आहे. याबाबत प्राधिकरणाच्या वतीने महापालिका आणि जलसंपदा विभागाला कळवण्यात आले आहे.

बैठकीत पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेच्या आगामी काळातील निवडणुका लक्षात घेत, शहरात कुठल्या प्रकरचा पाणी कपात न करण्याचा निर्णय नुकत्याच झालेलया कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबरोबरच शहराला अतिरिक्त स्वरूपाचा पाणी पुरवठा करण्याबाबत मुळशी धरणातील पाणी उपलब्ध करण्याबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मल्याळम अभिनेत्रीचं लैंगिक शोषण प्रकरण : ट्रायल पूर्ण करण्यासाठी केरळ सरकारने वेळ वाढवून मागितली, मात्र न्यायालयाचा नकार

Ranjitsinh Disale : मानसिक त्रास दिल्याचे,पैसे मागितल्याचे पुरावे द्या, सोलापूर जिल्हा परिषदेचे रणजितसिंह डिसले यांना पत्र

Somvati Amavasya 2021 | आयुष्यातून दारिद्र्य दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला हे उपाय नक्की करा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें