AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC टॉपर दर्शना पवार हत्याकांड, राहुल हंडोरे कसा पकडला? कुटुंबियांना किती वेळा फोन केले?; धक्कादायक माहिती समोर

एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या हत्येनंतर अखेर तिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे.

MPSC टॉपर दर्शना पवार हत्याकांड, राहुल हंडोरे कसा पकडला? कुटुंबियांना किती वेळा फोन केले?; धक्कादायक माहिती समोर
Rahul HandoreImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2023 | 7:37 AM
Share

पुणे : एमपीएससीला राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरेला पोलिसांनी अटक केली आहे. पाच दिवस फरार झालेल्या राहुल हंडोरेला पकडण्यात अखेर पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. या पाच दिवसात तो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर लपत फिरत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्याकडचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमधून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी तपासही सुरू केला आहे.

दर्शना पवारची हत्या केल्यानंतर राहुल महाराष्ट्राबाहेर फरार झाला होता. आधी तो सांगलीला गेला होता. त्यानंतर तो गोव्याच्या मारगोवा येथे गेला होता. नंतर तो चंदीगडलाही गेला. शेवटी तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला होता. स्वत:चा पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार जागा बदलत होता. या प्रवासात त्याने फोन स्विच्ड ऑफ ठेवला होता. त्यामुळे त्याला पकडणं कठिण झालं होतं. पण तो मुंबईत आल्यानंतर त्याचा सुगावा लागला आणि त्याच्या मुसक्या बांधता आल्या, असं पुणे पोलिसांनी सांगितलं.

पकडणं कठिण

दर्शनाच्या हत्येनंतर फरार झाल्यावर राहुल हंडोरे सातत्याने कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्याने कुटुंबीयांना पाचवेळा फोन केला होता. तसेच संपूर्ण माहिती तो घेत होता. कुटुंबीयांना फोन करताना तो स्वत:च्या फोनवरून फोन करत नसायचा. प्रवासात एखाद्या प्रवाशाला विनंती करून त्याच्या फोनवरून तो कुटुंबीयांशी संपर्क साधायचा. त्यामुळे त्याला पकडणं कठिण झालं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

अखेर तो पकडला

राहुल ज्या नंबरवरून कुटुंबीयांना फोन करायचा त्या नंबरवर आम्ही नंतर फोन करायचो. त्यावेळी संबंधित प्रवाशाकडून आम्हाला त्याची डिटेल्स मिळायची. मात्र, तो आमची पुढची स्टेप्स काय असणार आहे, याची माहितीही जाणून घ्यायचा. आम्ही त्याला पकडण्याचा प्रत्येकवेळी प्रयत्न केला. पण तो प्रत्येकवेळी ठिकाणं बदलायचा. त्यामुळे तो आमच्या हाती आला नाही. मात्र, तो अंधेरी स्टेशनवर पोहोचणार असल्याची खबर आम्हाला मिळाली अन् त्यानंतर तो आमच्या तावडीत सापडला, असं पोलिसांनी सांगितलं.

भावासोबत राहायचा

राहुल गेल्या काही वर्षापासून त्याच्या भावासोबत राहत होता. पुण्यात दोघेही राहत होते. तिथेच तो फुड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याचा भाऊही छोटेमोठे काम करत होता. राहुल पार्टटाईम जॉब करून एमपीएससीची परीक्षा देत होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक