AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना अटक

Vaishnavi Hagawane Death Case Updates: पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात फरार असलेले सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना शुक्रवारी पहाटे अटक झाली. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लताहगवणे, नणंद करिश्मा हगवणे या तिघांना यापूर्वीच अटक झाली होती.

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना अटक
Vaishnavi Hagawane
Follow us
| Updated on: May 23, 2025 | 7:40 AM

Vaishnavi Hagawane Death Case Updates: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. वैष्णवी संशयास्पद मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक झाली आहे. स्वारगेट परिसरात त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचे सुरुवातीला समोर आले होते. परंतु त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा मिळाल्या आहेत. तसेच वैष्णवी हिच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप करुन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक केली होती. आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार होते.

राजेंद्र हगवणे हे तळेगाव येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी कैद झाले होती. ही माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. परंतु या घटनेची अधिकृत माहिती अजूनही पोलिसांनी दिली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु तिच्या आई-वडिलांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला. माध्यमांमधून हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई सुरु केली. वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली. परंतु वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पथके वाढवण्याचे आदेश दिल्याचे गुरुवारी सांगितले होते.

वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी दिली होती. त्यानंतर तिचा छळ होत असल्याचे म्हटले होते.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.