Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी

कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 5:45 PM

पुणे : सध्या देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या आपल्या बीकेसीच्या सभेत तोफ डागली होती. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे वाटत नाही. तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेती पिकाला भाव मिळत नाही, पाण्यासाठी वणवन फिरावं लागतं हे महत्वाचं आहे. तर मराठवाड्यात उभा ऊस आहे तसाच आहे. उसाला तोड मिळत नाही म्हणून शेतकरीआत्महत्या करत आहे. परंतु सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारला (Mahavikas Aghadi government) टोला लगावला आहे.

दुर्दैवाची बाब

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पुण्यात आले असता बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायाला सरकारला वेळ नाही मात्र सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ज्या आघाड्या आता देशात आहेत त्यांनी सर्वात पहिलं आम्ही जणसामान्यांसाठी आहोत ही भावना ठेवावी. त्यांचे प्रश्न सोडविल्या शिवाय हटणार नाही असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण करावा. त्यांना तसे करावेच लागेल. परंतु कोणत्याही आघाडीने असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण केला नाही. मात्र तो विश्वास निर्माण केला तर जनता नक्कीच त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्र्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

केतकीचा समाचार

तसेच त्यांनी यावेळी अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या शरद पवार यांच्या टीकेला उत्तर ही दिलं. ते म्हणाले, कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.