AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उजनी धऱण थंडीने गारठले, माशांच्या भावात वाढ; थंडी आणि दरवाढीचा काय संबंध?

पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत. pune fish Rate increased

उजनी धऱण थंडीने गारठले, माशांच्या भावात वाढ; थंडी आणि दरवाढीचा काय संबंध?
| Updated on: Dec 09, 2020 | 5:15 PM
Share

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्याने सर्वत्र थंडी जाणवत आहे. कित्येकांना ही थंडी अल्हाददायक वाटत आहे. मात्र, थंडी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत. (Rate of fishes has increased in pune due to winter)

थंडी आणि दरवाढीचा काय संबंध?

उजनी धरणात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीमुळे या पाण्याचा गारठा वाढला आहे. या दोन्ही कारणांमुळे मासे वास्तव्यासाठी पाण्याच्या खोलवर जातात आहेत. परिणामी मच्छीमारांच्या जाळ्यात मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात आणखी भर म्हणून या धरणात माशांचे बीजदेखील टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे मासेमारी करणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी मासळी बाजारात माशांची आवक कमी झाली आहे. आवकच घटल्याने माशांच्या दरात वाढ झाली आहे.

उजणी धऱण गोड्या पाण्याच्या मासेमारीसाठी प्रसिद्ध

उजनी धरणामुळे इंदापूर तालुक्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे. राज्यात गोड्या पाण्याची सर्वात मोठी मासेमारी याच धरणात होते. त्यामुळे इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मासळी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. मात्र, आवक घटलेली असताना, ग्राहकांकडून मागणी वाढल्याने माशांचे भाव वधारले आहेत.

 पूर्वीचे दर                                  सध्याचे दर

चिलापी                    60 ते 70 रु                            100 ते 120 रु

वाम्ब                       300 ते 350 रु                           400 ते 450 रु

मृगळ                     250 रु                                     350 रु

कटला                   100 ते 120 रु                         150 ते 160 रु

शिंगाड़ा                 150 रु                                    220 रु

खेकड़ा                  100रु                                      150 रु

गुगळी                  180 ते 200 रु                          250 ते 260 रु

रव                       100 ते 120                                    150 ते 160 रु

संबंधित बातम्या :

मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?

आता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना दिलासा

(Rate of fishes has increased in pune due to winter)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.