AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय ‘उद्योग’ बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज

चाकण MIDC मधील उद्योगांचे स्थलांतर व बंद पडणाऱ्या कंपन्यांवरून रोहित पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंतांना थेट आव्हान दिले. २० कंपन्या बंद पडल्याने २ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. राज्य सरकार उद्योगांना पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर देत नसल्याने महाराष्ट्र उद्योगात पिछाडीवर पडत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

राजकीय 'उद्योग' बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 1:15 PM
Share

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आधी इतर राजकीय उद्योग बंद करावेत. मी तुम्हाला आव्हान देतो. माझ्यासोबत चर्चेला या. संयुक्त पत्रकार परिषद बोलावू. त्यात मी पुराव्यानिशी आकडेवारी सादर करतो. तुमच्यात धाडस असेल तर या समोर, असं आव्हानच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलं आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसीतून उद्योगांचे स्थलांतर होत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सामंत यांना चांगलंच घेरलं.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला होता. चाकण एमआयडीसीती कंपन्या सुविधांच्या अभावी स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. 20 कंपन्या टाळं लावणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. राज्यासाठी ही गोष्ट निश्चित चांगली नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यात लक्ष घालावे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत, ज्या कंपन्यांची नोंदणी आहे, पण त्या कधी सुरूच झाल्या नाहीत, त्या बंद होत असल्याचं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि उद्योग मंत्र्यांवर हल्लाबोल केला.

तुम्ही आकडे सांगा. या सरकारमध्ये धमक आहे का? आमच्याशी चर्चा करायला. आम्ही खरे आकडे देऊ. सरकारकडून उत्तर द्यायला समोर या. उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग करणं बंद करावं आणि आमच्यासमोर येऊन आकडे सादर करा, असं रोहित पवार म्हणाले.

हे आमचं धाडस, बाकीच्यांचं…

भाजपच्या बोलणाऱ्या आमदारांना उद्योग आणि विकास काय हे माहीत नाही. वरून आदेश येतात त्यावर ते बोलतात. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार सुरू आहे. कोण बोलतं ते महत्त्वाचं आहे. भाजपमधील काही लोक चांगले आहेत. पण दुर्देवाने ते बोलत नाहीत. पण इतरांना व्यवसाय कळत नाही. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत. ते काय करतात? कसे करतात? माहीत आहे. आम्ही आव्हान देतो, त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. संयुक्तिक पत्रकार परिषद घ्यायला तयार आहे. त्यांनी समोर यावं आणि आकडे द्यावेत. टीका करण्यापेक्षा आमच्यासोबत पीसी घ्या. आम्ही पुराव्यासकट, आकड्यांसकट महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सांगू. हे आमचं धाडस आहे. बाकीच्यांचं माहीत नाही, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सरकार सुविधाच देत नाही

एका खासदाराने केंद्राच्या मंत्र्याला प्रश्न विचारला. त्यावर केंद्रीय मंत्र्याने उत्तर दिलं. त्यातून राज्यात किती कंपन्या बंद पडल्या त्याची माहिती मिळाली. केंद्रात सरकार भाजपचं आहे. नीती आयोग पंतप्रधानाच्या अंतर्गत आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीत महाराष्ट्र पाच नंबरला गेला, कधीकाळी एक नंबरला होतो, असं नीती आयोगच म्हणतंय. व्यावसायिक धंदा करायला तयार आहेत. पण सरकार इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला कमी पडतं. हे मी सांगत नाही. हे नीती आयोग सांगत आहे, असा दावाही त्यांनी केला.

राजीनामा द्या, मग बोला

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणारे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली. याच विखे पाटलांना सांगायचंय तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाला. पेपर फुटला, असं मी म्हणत होतो. त्यावेळी हेच विखे म्हणत होते, रोहित पवार खोटं बोलत आहेत. रोहित पवारांवर एफआयआर दाखल करा. आता मॅटनेच भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केलं आहे. त्यावर आधी राजीनामा द्या. त्यानंतर पवारांवर बोला, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?