Rohit Pawar: राजकारणाचा स्तर घालवला, किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नका; रोहित पवारांचा भाजपला टोला

Rohit Pawar: रोहित पवार यांनी कालच्या या घटनेचा निषेध नोंदवला आहे. रोहित पवार यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून हा निषेध नोंदवला आहे.

Rohit Pawar: राजकारणाचा स्तर घालवला, किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नका; रोहित पवारांचा भाजपला टोला
राजकारणाचा स्तर घालवला, किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नका; रोहित पवारांचा भाजपला टोला
Image Credit source: tv9 marathi
प्रदीप कापसे

| Edited By: भीमराव गवळी

May 17, 2022 | 10:38 AM

पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार (rohit pawar) यांनी निषेध केला आहे. तसेच या प्रकरणावरून त्यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपने (bjp) राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नका, असा टोला लगावतानाच मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पुण्यात काल भाजप नेत्या स्मृती ईराणी आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत स्मृती ईराणी यांचा निषेध नोंदवला. तब्बल दोन ते तीन तास राष्ट्रवादीची उग्र निदर्शने सुरू होती. राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं.

रोहित पवार यांनी कालच्या या घटनेचा निषेध नोंदवला आहे. रोहित पवार यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून हा निषेध नोंदवला आहे. गॅस सिलिंडर 350 रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात स्मृतीताई आंदोलन करायच्या. स्मृतीताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. यावेळी त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

तुम्हीच अशा प्रवृत्तींना पाठबळ देत आहात

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

महागाई की रानी, स्मृती ईराणी

दरम्यान, काल स्मृती ईराणी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. महागाईवरून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मृती ईराणी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. महागाई की रानी, स्मृती ईराणी अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सर्व परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही घटनास्थळी आले. त्यांनीही जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तापले. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सुरू असलेल्या हॉलमध्ये घुसून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आमनेसामने आल्या. त्यांच्यात धक्काबुक्की झाली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें