AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवलेंच्या ‘र ला र – ट ला ट’ कवितांवरुन शेरेबाजी, चाकणकरांच्या घरावर रिपाइंच्या महिला आघाडीचा मोर्चा

र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणारच" असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला होता. (RPI protest Rupali Chakankar Pune)

आठवलेंच्या 'र ला र - ट ला ट' कवितांवरुन शेरेबाजी, चाकणकरांच्या घरावर रिपाइंच्या महिला आघाडीचा मोर्चा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 27, 2021 | 2:14 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या घरावर रिपाइंच्या महिला आघाडीने मोर्चा काढला. रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर टीका केल्यानंतर चाकणकरांविरोधात आरपीआयची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका रुपाली चाकणकरांनी केली होती. त्यानंतर चाकणकरांच्या पुण्यातील घरावर रिपाइंने मोर्चा काढला. (RPI women wing protest at Rupali Chakankar Pune Home)

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या? 

“रामदास आठवले यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल जे वक्तव्य केलं, ते मोर्चात सहभागी 25 ते 30 हजार शेतकरी आंदोलकांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. दिवसभर कविता करण्यात व्यस्त असलेल्यांनी शेती कशी करावी, याचीही माहिती घ्यावी. र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणारच” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला होता.

आठवलेंनी आझाद मैदानात जावं, चाकणकरांचा सल्ला

“केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांची पाठराखण करणाऱ्या रामदास आठवलेंनी हिंमत असेल, तर आझाद मैदानात जाऊन आंदोलक शेतकऱ्यांचं समाधान करावं. आठवले पाठिंबा देत असलेल्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, हे त्यांना सांगू इच्छिते” असंही चाकणकर म्हणाल्या होत्या.

रामदास आठवले काय म्हणाले होते?

“मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही” असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं होतं. (RPI women wing protest at Rupali Chakankar Pune Home)

मुंबईत शेतकरी आंदोलनाची धडक

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी रविवार 24 जानेवारीला हजारोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले होते (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ सोमवारी राजभवनावर धडक देणार होतं. त्याविषयी बोलताना आठवलेंनी शेतकऱ्यांचा मुंबईतील मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट असल्याची टीका केली होती.

संबंधित बातम्या :

र ला र आणि ट ला ट जोडून आठवलेंचे कवितांचे स्टंट, रुपाली चाकणकरांचा टोला

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू : विश्वास नांगरे पाटील

(RPI women wing protest at Rupali Chakankar Pune Home)

Follow Us
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार