Kusti : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त होण्याला बाळासाहेब लांडगेंचा मनमानी कारभार जबाबदार; संदीप भोंडवेंचा आरोप

कुस्तीच्या विविध स्पर्धाही मागील दोन वर्षांपासून घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे राज्यातील कुस्तीगीरांचे नुकसान होत होते. पुणे जिल्ह्याला ही स्पर्धा घेऊ दिली जात नव्हती. पुणे जिल्हा आणि पुणे शहराची संलग्नताही त्यांनी रद्द केली होती, असा आरोप संदीप भोंडवे यांनी बाळासाहेब लांडगे यांच्यावर केला.

Kusti : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त होण्याला बाळासाहेब लांडगेंचा मनमानी कारभार जबाबदार; संदीप भोंडवेंचा आरोप
बाळासाहेब लांडगे यांच्यावर आरोप करताना संदीप भोंडवे
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 02, 2022 | 3:21 PM

पुणे : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे (Maharashtra Wrestling Council) सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळेच कुस्तीगीर संघटना बरखास्त झाली आहे. ते अगदी अध्यक्षांनासुद्धा आदेश जुमानत नव्हते, असा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे (Sandeep Bhondve) यांनी केला आहे. त्याचारोबर त्यांनी लांडगे यांच्या मुलावर त्यांनी आरोप केले आहेत. ते पुण्यात बोलत होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्तीगीर महासंघाने घेतला आहे. 30 जून रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य कुस्तीगीर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तावाकडे दुर्लक्षदेखील केले जात आहे, असे सांगत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त (Dismissal) करत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या परिषदेचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत.

‘मनमानी कारभार’

संदीप भोंडवे म्हणाले, की मागील काही काही वर्षांपासून बाळासाहेब लांडगे आणि त्यांचा मुलगा यांच्या मनमानी कारभार करून भ्रष्टाचार करत होते. महाराष्ट्रातील विविध कुस्तीगीर संघटना त्यांना जाब विचारत असताना त्यांना कोणतीही दाद ते देत नव्हते. मार्च महिन्यात पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने बालेवाडीत कुस्ती स्पर्धा झाली, त्याचे प्रायोजकत्व सिटी अॅमानोराला देण्यात आले होते. त्या संबंधीच्या करारनाम्याची प्रत सदस्य या नात्याने आम्ही मागितली असता त्यांनी दिली नाही. चार दिवस आमरण उपोषण केल्यानंतरही ती देण्यात आली नाही. शेवटी आम्ही बाळासाहेब लांगडेंविरोधात स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली, असे भोंडवे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘बाळासाहेब लांडगेंशी संपर्क नाही’

कुस्तीच्या विविध स्पर्धाही मागील दोन वर्षांपासून घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे राज्यातील कुस्तीगीरांचे नुकसान होत होते. पुणे जिल्ह्याला ही स्पर्धा घेऊ दिली जात नव्हती. पुणे जिल्हा आणि पुणे शहराची संलग्नताही त्यांनी रद्द केली होती. या सर्वांच्या बाबतीत शरद पवार तसेच भारतीय कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांकडेही तक्रार केली. त्यानंतर याची चौकशी करण्याी घोषणा करण्यात आली. त्यानंतर वार्षिक सभा घेऊन त्यात सगळ्या खोट्या गोष्टी दाखवल्या. त्यामुळे सर्वांनी त्यांच्याविरोधात एकत्र येत तक्रारी केल्या, असे भोंडवे म्हणाले. दरम्यान, याचप्रकरणी बाळासाहेब लांडगे यांना या सगळ्या आरोपांवर विचारण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें