‘मी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत, पैसे घेतल्याचा आरोप खोटा’, ‘ससून’च्या डीनचं स्पष्टीकरण

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. भाजपचा एका मंत्र्याने संजीव ठाकूर यांना पैसे दिले. हे पैसे हवाला आणि गुन्हेगारांच्या माध्यमातून देण्यात आले, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपांवर संजीव ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'मी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत, पैसे घेतल्याचा आरोप खोटा', 'ससून'च्या डीनचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 4:58 PM

योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. सजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप संजीव ठाकूर यांनी फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करु, असं संजीव ठाकूर म्हणाले आहेत. आपल्याला कोणत्या मंत्र्याचा फोन आला नाही. आरोप चुकीचे आहेत, असं संजीव ठाकूर म्हणाले आहेत. तर ललित पाटील याच्यासह संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा. ललित पाटीलचे संबंध भाजपच्या मंत्र्यांसोबतही आहेत, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. या प्रकरणी संजीव ठाकूर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय.

रवींद्र धंगेकर यांनी नेमका काय आरोप केलाय?

“ललित पाटील याचे संबंध हे भाजपच्या एका मंत्र्यासोबत आहे. हा मंत्री गुन्हेगारी विश्वात फिरतो, गुन्हेगारांबरोबर राहतो, त्याचे गुन्हेगारांबरोबर संबंध आहेत, निवडणुकीत गुन्हेगारांचा वापर करतो, असा भाजपचा एक मंत्री आहे. हे मी आज नाही तर पहिल्या दिवसापासून बोलतोय. या मंत्र्याकडून ससूनचे डीन संजीव ठाकूर यांनी प्रचंड पैसे घेतले आहेत. हे पैसे हवाला आणि गुन्हेगारांमार्फत घेतले आहेत”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय.

“मंत्र्याने ठाकूर यांचे हात ओले केले होते. त्यामुळे संजीव ठाकूर ललित पाटीलला पंचतारांकीत सुविधा देत होते. ललित पाटील प्रकरणी ठाकूर यांना देखील सहआरोपी करावं. ललित पाटील याच्यावर जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे संजीव ठाकूर यांच्यावरही दाखल करावेत, अशी आम्ही मागणी करतोय”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

संजीव ठाकूर यांचं स्पष्टीकरण काय?

“कुठल्याही राजकारण्याने मला फोन केलेला नाही. कुठल्याही आरोपीला तशी ट्रिटमेंट दिली जात नाही. आम्हाला कुणीही फोन केला नाही. मला आजपर्यंत कुणाचाही फोन आलेला नाही, असं संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केलं. मी सध्या कामात बिझी आहे. “मला अनेक ऑपरेशन करायचे आहेत. त्यामुळे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वेळ मिळाल्यावर निर्णय घेईल. माझे मिळ आणि कायदे तज्ज्ञांनी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेईन”, अशी प्रतिक्रिया संजीव ठाकूर यांनी दिली.

“माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. मी कायदेशीर दृष्टीकोनाने सल्ला घेत आहे. कारागृह कमिटीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाहीय. चुकीच्या बातम्या सुरू आहेत. मला कुठल्याही मंत्र्यांचा फोन आला नाही. याबाबतचा आरोप चुकीचा आहे. मी सर्जन आहे. मला आता लॉची डिग्री घ्यावी लागणार, तेव्हा मोक्का काय असतो ते कळणार आहे, असा टोला त्यांनी रवींद्र धंगेकर यांना लगावला. तसेच मी कुठलंही पत्र दिलं नाहीय. अर्धवट पत्र दाखवलं जात आहे. मी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत.पैसे घेतल्याचा आरोप खोटा आहे”, असं संजीव ठाकूर म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.