भाजपची सर्वात मोठी रणनीती, प्रत्येक मतदारसंघाचा मेगा प्लॅन तयार, पडद्यामागच्या हालचाली काय?

भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी रणनीती आखली आहे. भाजपने विधानसभेच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये वॉर रुमची स्थापना केली आहे. या वॉर रुममध्ये महत्त्वाच्या हालचाली घडणार आहेत. विशेष म्हणजे मित्रपक्षाची जागा निवडून आणण्यासाठी देखील भाजप या वॉर रुमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

भाजपची सर्वात मोठी रणनीती, प्रत्येक मतदारसंघाचा मेगा प्लॅन तयार, पडद्यामागच्या हालचाली काय?
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 4:19 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका असणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या गोटात तर जोरदार हालचाली सुरु आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या गोटातही महत्त्वाच्या हालचाली घडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी नुकतीच सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत तीनही पक्षाच्या लोकप्रतिनीधींना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय 2024’ असं मिशन ठेवलं आहे. भाजपने या मिशनसाठी प्लॅनदेखील आखला आहे. भाजप महाराष्ट्रभर वॉर रुमचे जाळे तयार करणार आहे. विधानसभेच्या 288 आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 मतदारसंघांमध्ये भाजप वॉर रुम सुरु करणार आहे. भाजपचं वॉर रुमच्या माध्यमातून सर्व मतदारसंघांवर विशेष लक्ष असणार आहे.

भाजप या वॉर रुमच्या माध्यमातून मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. भाजप वॉर रुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारांवर लक्ष ठेवणार आहे. तसेच भाजप या वॉर रुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील समस्या आणि विषयांची माहिती घेणार आहे.

‘भाजप मित्रपक्षांचीसुद्धा जागा जिंकून आणणार’

भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी या वॉर रुमबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. “भाजप ३६५ दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे. भाजपने २०१४ पासून निवडणूक व्यवस्थापनामध्ये एक वैशिष्ट्य तयार केलं आहे. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघात २८८ वॉर रुम तयार करत आहोत. भाजप २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात तयारी करत आहे. ही तयारी महायुतीसाठी आहे”, असं श्रीकांत भारतीय यांनी सांगितलं.

“एखादा मतदारसंघ महायुतीच्या शिवसेना मित्रपक्षांकडे असेल, तर ती जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यादृष्टीने आम्ही या वॉर रुम तयार करत आहोत”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत भारतीय यांनी दिली. “या वॉर रुममध्ये तीन प्रकारच्या जबाबदारी देण्यात येणार आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करणे, अधिक गतीमान पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करणे, तिसरे काम म्हणजे केंद्र आणि राज्यातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे होय. प्रत्येकी एक कमांड सेंटर तयार केले आहेत. केंद्राचे सर्व व्यवस्थापन हे प्रत्येक वॉर रुम पर्यंत पोहचवण्याचे काम केले जाईल”, अशी माहिती श्रीकांत भारतीय यांनी दिली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.