दहाव्या, तेराव्यावर कावळे फिरतात… शरद पवारांवर या आमदाराचा सर्वात मोठा हल्ला
NCP and Shivsena: खटाव माणच्या दुष्काळाचे फक्त राजकारणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केले आहे. ही योजना राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्राकडे आहे. तसेच त्यांच्या पक्षाच्या स्थानिक उमेदवाराला याचा आभ्यास नाही. त्यामुळे ते नेत्याला काय समजवून सांगणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार राज्यभर पक्षाची बांधणी करत आहेत. ठिकाठिकाणी त्याचे दौरे सुरु आहेत. शरद पवार यांचे सातारामधील कोरेगाव मतदार संघात दौरे वाढले आहे. या दौऱ्यावरुन कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. आमदार महेश शिंदे म्हणाले की, दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात, अशी टीका त्यांनी केली. आमदार शिंदे यांच्या या टीकेमुळे राजकीय गदारोळ वाढणार आहे.
योजना कधीच झाली पूर्ण
शरद पवारांनी साताऱ्यातील दौऱ्यात जिहे कटापूर योजनेवर भाष्य केले होते. मी या योजनेबाबत तीन महिन्यांनी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे संकेत त्या माध्यमातून दिले होते. यावर बोलताना आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी इंडिया आघाडीचे सरकार येण्याबाबत भाष्य केले होते. मात्र त्यांनी काही ही सांगितले तरी जिहे कटापूर योजना दीड वर्षांपूर्वीच पूर्ण होवून तिचे पाणी सर्वत्र पोहचले आहे.
आता विस्तारी जिहे कटापूर योजना करायची आहे. मात्र या योजनेच्या पूर्ण नावाचा उल्लेख शरद पवार यांनी टाळला. नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्षमणराव इनामदार उपसा सिंचन जिहे कटापूर योजना असे या योजनेस नाव आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचाई योजनेत या योजनेचा समावेश केला आहे. हे शरद पवार यांना माहीत नाही? ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
स्थानिक उमेदवाराचा अभ्यान नाही…
खटाव माणच्या दुष्काळाचे फक्त राजकारणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केले आहे. ही योजना राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्राकडे आहे. तसेच त्यांच्या पक्षाच्या स्थानिक उमेदवाराला याचा आभ्यास नाही. त्यामुळे ते नेत्याला काय समजवून सांगणार? असा टोला देखील शशिकांत शिंदे यांना त्यांनी लगावला. तसेच शरद पवार यांच्या कोरेगावमधील वाढत्या दौऱ्यावर देखील आमदार महेश शिंदे यांनी टीका केली.