राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवारांचा बळीचा बकरा करू नका: रामदास आठवले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू आहेत. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (sharad pawar can't win presidential election, says ramdas athawale)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवारांचा बळीचा बकरा करू नका: रामदास आठवले
ramdas athawale

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू आहेत. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधक शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. पवार लढायला तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं सांगतानाच पवार या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. (sharad pawar can’t win presidential election, says ramdas athawale)

रामदास आठवले यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, अॅड. आयुब शेख, हिमाली कांबळे, शशिकला वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते धोकेबाज नेते नाहीत, असंही स्पष्ट केलं. पुणे महापालिकेची आगामी निवडणुक आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. पुन्हा आमचीच सत्ता येईल असे भाकीत करतानाच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढले‌ तर आम्ही त्यांच्यावर मात करू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कमळ चिन्हावरच लढणार

आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. आगामी पालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढविली जाईल. मात्र, विधानसभा आमच्या चिन्हावर लढविण्याचा प्रयत्न आहे, असं सांगतानाच भाजपाच्या‌ सहकार्याने रिपाइंला उपमहापौरपद मिळाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुणे पालिकेचे विभाजन करा

पुण्याचा विस्तार होत असून पुण्याची लोकसंख्या 40 लाखाच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले. महापालिका करापालिकेच्या हद्दीत 23 गावे समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढले आहे. पुणे मनपाचे विभाजन करून दुसरी एक महापालिका करावी. राज्य‌ सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरएसाठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

‘नो कोरोना, नो कोरोना’चा नारा

‘नो कोरोना, नो कोरोना’ असा आठवलेंचा नवा नारा आहे. मी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता, ‘नो कोरोना नो कोरोना’चा नारा देत असल्याचे त्यांनी सांगितले. (sharad pawar can’t win presidential election, says ramdas athawale)

 

संबंधित बातम्या:

सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे राजकीय बाप, बापाच्या एका मौलिक सल्ल्याने मुलाच्या आयुष्याला कलाटणी मिळते- सुभाष देशमुख

पटोले, चव्हाण, जगताप यांच्यावर ‘त्या’ आंदोलनाचे गुन्हे दाखल केले का?; बाईक रॅलीवर नरेंद्र पाटील ठाम

आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते; हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

(sharad pawar can’t win presidential election, says ramdas athawale)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI