सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे राजकीय बाप, बापाच्या एका मौलिक सल्ल्याने मुलाच्या आयुष्याला कलाटणी मिळते- सुभाष देशमुख

सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे राजकीय बाप, बापाच्या एका मौलिक सल्ल्याने मुलाच्या आयुष्याला कलाटणी मिळते- सुभाष देशमुख
सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहे. बापाचं वय झालं तर पोराला वाटतं की आत काय बापाचं ऐकायचं. पण बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, अशा शब्दात देशमुख यांनी शिंदे यांचं राजकारणातील महत्व अधोरेखित केलं आहे.

रोहित पाटील

| Edited By: सागर जोशी

Jul 16, 2021 | 6:01 PM

सोलापूर : सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना माजी मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांचं कौतुक केलं. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहे. बापाचं वय झालं तर पोराला वाटतं की आत काय बापाचं ऐकायचं. पण बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, अशा शब्दात देशमुख यांनी शिंदे यांचं राजकारणातील महत्व अधोरेखित केलं आहे. सोलापुरातील 2 ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्ती कार्यक्रमात देशमुख आणि शिंदे एका व्यासपीठावर आले होते. (Sushilkumar Shinde’s appreciation from Subhash Deshmukh)

‘सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे राजकीय बाप’

राजकीय बाप म्हणून आम्ही सगळे तुमचा सल्ला नक्की ऐकणार. तुमच्या अनुभवाचा आणि संबंधांचा आम्हाला फायदाच होईल. सोलापूरच्या कोटणीस स्मारकावर तुम्ही चायनाचे लोक आणत जा. तुमच्या पत्राला वजन आहे. तिथले राजदूत इकडे येतील. त्यामुळे कोटणीस स्मारकाचा जगभरात लौकिल होईल. आपण खूप चांगलं काम केलं आहे. तुमचे खूप चांगले संबंध आहेत, अशा शब्दात देशमुख यांनी शिदेंच्या राजकीय प्रवासाचं कौतुक केलंय. त्याचबरोबर सिद्धेश्वर यात्रेला मोठमोठे कलाकार आणले तर सोलापूरचं चांगलं मार्केटिंग होईल, असंही देशमुख यावेळी म्हणाले. सोलापूरचा नागरिक आणि पुत्र म्हणून तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे, फक्त राजकीय सोडून, अशी मिश्किल टिप्पणीही देशमुख यांनी यावेळी केली आहे.

सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले होते?

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे 29 जून रोजी इंदापूर मध्ये आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केली होती. 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली होती.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसच्या ‘स्वबळा’ला सुशीलकुमार शिंदे यांचंही बळ; म्हणाले…

सुशीलकुमार शिंदे चुकून चुकले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव फोडलं!

Sushilkumar Shinde’s appreciation from Subhash Deshmukh

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें