AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शरद पवारांकडून दगडूशेठ गणपतीचं बाहेरुनच दर्शन, मासांहाराचं दिलं कारण! भिडे वाड्याचीही पाहणी

मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

Sharad Pawar : शरद पवारांकडून दगडूशेठ गणपतीचं बाहेरुनच दर्शन, मासांहाराचं दिलं कारण! भिडे वाड्याचीही पाहणी
शरद पवारांकडून दगडूशेठ गणपतीचं बाहेरुनच दर्शन, मासांहाराचं दिलं कारण! Image Credit source: tv9
| Updated on: May 27, 2022 | 4:36 PM
Share

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) नास्तिक असल्याचा थेट आरोप केलो हाता. मात्र त्यानंतर शरद पवारांचे देवासमोरचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर शरद पवार आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Ganpati Darshan) दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कारण पुण्यात मासाहाराचं कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणं टाळलं? असा सवाल आता राजकारणात चर्चेत आहे. आता यावरूनही बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

आनंद दवे काय म्हणाले ऐका

आनंद दवे यांची मिश्किल प्रतिक्रिया

यावर ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. भक्त माणूस देवळात आला, शरद पवारसाहेब पुण्यातील दगडूशेठ गणपती चे दर्शन घेणार आहेत याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आजपर्यंत केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार साहेब आत्ता मंदिरात जात आहेत आणि आम्हाला ते याची डोळी याची देही पाहायला मिळत आहे. या बद्दल श्री गणपतीचे आभार अशी खोचक प्रतिक्रिया दवे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून जातीय टीका होत असल्याचा आरोप आणि त्याला पवारांची समर्थन असल्याचाही आरोप करत, ब्राम्हण महासंघाने काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट नाकारली होती. त्यांनी शरद पवार यांनी अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली होती.

राज ठाकरे यांच्याकडून पवारांवर अनेकदा टीका

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवताना राष्ट्रवादीच्या उदयापासून जातीय राजकारण पसरले, तसेच शरद पवार देव मानत नाही. त्यांचा देवाला हात जोडणार एक फोटोही शोधून सापडणार नाही. ते नास्तिक आहेत. अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. मात्र त्यानंतर पवारांचे अनेक फोटो व्हायरल होत होते. ज्या फोटोत ते देवासमोर दिसत होते.  या फोटोंची आणि जातीय राजकारणाची गेल्या काही दिवसात बरीच चर्चा रााहिली आहे. आता पुन्हा पवारांच्या गणपती दर्शनाने आणि मंदिरात न जाता बाहेरून दर्शनाने हाच मुद्दा चर्चेत आला आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.