Sharad Pawar : राज ठाकरे इफेक्ट? पवार पुण्यात थेट बाप्पाच्या चरणी, नंतर म.फुलेंच्या भीडेवाड्यात !

शरद पवार थेट पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. दगडूशेठच्या दर्शनापूर्वी शरद पवार यांनी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली त्या भिडे वाड्याचीही पाहणी पवार यांनी केलीय.

Sharad Pawar : राज ठाकरे इफेक्ट? पवार पुण्यात थेट बाप्पाच्या चरणी, नंतर म.फुलेंच्या भीडेवाड्यात !
योगेश बोरसे

| Edited By: सागर जोशी

May 27, 2022 | 3:56 PM

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) हे नास्तिक आहेत. ते क्वचितच कुठल्या मंदिरात दिसून येतील, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर आज शरद पवार थेट पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Dagadusheth Halwai Ganpati) दर्शनाला पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. दगडूशेठच्या दर्शनापूर्वी शरद पवार यांनी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली त्या भिडे वाड्याचीही (Bhide Wada) पाहणी पवार यांनी केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांवर जातीपातीच्या राजकारणाचा, तसंच ते नास्तिक असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तरही दिलं होतं.

हिंदू महासभेकडून पवारांच्या भूमिकेचं स्वागत

आनंद दवे म्हणाले, की भक्त माणूस देवळात आला. शरद पवारसाहेब पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आजपर्यंत केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार साहेब आता मंदिरात जात आहेत आणि आम्हाला ते याची देही, याची डोळा पाहायला मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी घेतलेली ही भूमिका हिंदुत्त्ववादी लोकांना, कार्यकर्त्यांना निश्चितच आनंद देणारी आहे, असे हिंदू महासंघ मानतो, असे दवे म्हणाले.

पवारांकडून राज ठाकरेंच्या आरोपांचं खंडन

शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या नास्तिकतेच्या आरोपाचं खंडन केलं होतं. माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत. त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतील असं नसावं, त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी लगावला होता.

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून दाखला

त्यानंतर राज ठाकरे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वाक्याचा आधार घेत पवारांवर पलटवार केला होता. औरंगाबादेतील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘पवारसाहेब तुम्ही जाती जातीत जे भेद निर्माण करताय त्यातून भेद निर्माण होतोय. हातात पुस्तक घेऊन त्यावर लेखकाचं नाव बघून प्रतिक्रिया देतात. मी बोलल्यानंतर आता शिवाजी महाराजंचं नाव घेत आहेत. काही तरी व्हिडीओ काढताय, तल्लीन झालाय. गीतरामायण ऐकत आहेत. बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवत आहात. कशाला खोटं करतात. मी म्हटलं पवार नास्तिक आहे. नंतर देवाचे फोटो काढायला लागले. कशाला फोटो काढता. तुमची कन्या लोकसभेत म्हणाली माझे वडील नास्तिक आहे’, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें