AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत मोठ्या घडामोडी?, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र; चर्चा काय?

बारामतीत आज नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निमंत्रणावरून झालेल्या वादाचे पडसाद आजच्या कार्यक्रमात दिसणार बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य असा सभामंडप तयार करण्यात आला आहे.

बारामतीत मोठ्या घडामोडी?, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र; चर्चा काय?
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2024 | 11:15 AM
Share

बारामती | 2 मार्च 2023 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत मोठ्या घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. बारामतीतील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघीही एकमेकींच्या विरोधात बारामतीच्या रणांगणात दिसणार आहेत. पण त्यापूर्वीच आज या दोघी नणंद-भावजया एकमेकींना भेटल्या आहेत. त्यांच्यासोबत खुद्द शरद पवारही आहेत. त्यामुळे या पवार कुटुंबातील तीन सदस्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार आले आहेत. सोबत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही बैठकीला आहेत. हे तिघेही या संस्थेचे ट्रस्टी आहेत. संस्थेच्या कामाचा आढावा घेतानाच संस्थेशी संबंधित निर्णयही या बैठकीत घेतले जाणार आहेत. यावेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची काय चर्चा होते? तसेच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची काही चर्चा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिल्यांदाच एकत्र

या बैठकीचं वैशिष्ट्ये म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत एकमेकींविरुद्ध लढण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर या दोघी नणंद भावजया पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये काय चर्चा होते? राजकीय चर्चा होणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बारामतीकरांनाही या भेटीची उत्सुकता लागली आहे.

बारामतीत शक्तिप्रदर्शन

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच नमो रोजगार मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या महा रोजगार मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. तिन्ही पक्षांच्या बॅनर्स आणि होर्डिंग्जने बारामती गजबजून गेली आहे. तसेच तिन्ही पक्षांचे चिन्ह असलेले झेंडेही बारामतीत लावण्यात आले आहेत. चौकाचौकात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज बारामतीत येणार असून शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज बारामतीत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?