Uday Samant : व चा म झाला, सावंतांवर करायचा होता हल्ला, तो सामंतांवर झाला, काय म्हणाले शिवसैनिक?

त्यावेळी बोलताना एका शिवसैनिकांने सांगितलं, आम्हाला वाटलं गाडीत तानाजी सावंत (Tanaji Sawant) बसलेत, आम्हाला त्यांना अडवायचं होतं, पण गाडीत उदय सामंत निघाले, त्यामुळे सावंतांवरचा हल्ला हा सामंतांवरती झालाय का?

Uday Samant : व चा म झाला, सावंतांवर करायचा होता हल्ला, तो सामंतांवर झाला, काय म्हणाले शिवसैनिक?
व चा म झाला, सावंतांवर करायचा होता हल्ला, तो सामंतांवर झाला, काय म्हणाले शिवसैनिक?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 10:22 PM

पुणे : राज्यातलं राजकारण आधीच शिवसेना खासदार संजय राऊत यांची अटक आणि इतर विविध मुद्द्यांवरून शिगेला पोहोचलं होतं. तर दुसरीकडे नेत्यांचे दौऱ्यावरती दौरे (Shivsena MLA) सुरू होते. आज आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असतानाच शिवसैनिकांनी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीची काच फुटल्याचे दिसून आले. मात्र या हल्ल्यानंतर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी भलताच प्रकार समोर आला. त्यावेळी बोलताना एका शिवसैनिकांने सांगितलं, आम्हाला वाटलं गाडीत तानाजी सावंत (Tanaji Sawant) बसलेत, आम्हाला त्यांना अडवायचं होतं, पण गाडीत उदय सामंत निघाले, त्यामुळे सावंतांवरचा हल्ला हा सामंतांवरती झालाय का? असा संवाल सहाजिकच प्रत्येकाच्या मनात उपस्थित होतोय.

शिवसैनिक काय म्हणतात तेही ऐका

शिवसैनिकांचा बंडखोरांना कडकडीत इशारा

सर्व शिवसैनिक यावेळी होते. थोडासा वेळ अजून पोलीस आले नसते तर त्याच्या गाडीचा पूर्ण भुगा झाला असता. तो गद्दार पळून गेला, तानाजी सावंत हा गद्दार आहे. 40 जणांच्या गाड्या कुठे महाराष्ट्रात दिसल्या की त्या फोडल्या जाणार आहेत, सर्व शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आत्तापर्यंत साहेबांचा तसा आदेश नव्हता. मात्र यांनी गद्दारपणाची आता थोडी थोडी सुरुवात केली. अशी संतप्त प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी दिली आहे. तसेच या गद्दारांच्या जवळपास जो कोणी दिसेल त्या सर्वांच्या गाड्या फोडल्या जातील असाही इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या बंडखोरांना बदडून काढणार, यांनी कुठे कायदा पाळलाय, शिवसेनेने निवडून दिले, त्या शिवसेनेला सोडून हे पळून गेले, असेही यावेळी शिवसैनिक म्हणाले आहेत.

गाडी फोडल्याचा व्हिडिओ पाहा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

तर या हल्लाबाबत मला कोणतीही माहिती नाही. मी माहिती घेऊन याबाबत बोलेन अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुण्यातून दिली आहे. मात्र या हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही कठोर पाऊलं उचलण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यातलं पोलीस प्रशासन हे अलर्ट मोडवर आलं आहे. ज्यावेळेस हे बंडखोर आमदार गोव्यातून मुंबईत परतले, त्याचवेळी आमदारांच्या सुरक्षेत चांगलीच वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही असे प्रकार घडत असल्याने याबाबत आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच या प्रकरणी काही शिवसैनिकांची धरपकड होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकारणाचा पारा आणखी चढला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.