Pune : किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर, सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह किरण साळी, सुरज लोखंडे, चंदन साळुंके, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे सनी गवते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Pune : किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर, सोमय्या राज्यपालांच्या भेटीला
किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 1:06 PM

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या पुणे (Pune) महापालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचले होते. नेमक्या त्याच वेळी पुण्यातील शिवसैनिक पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारासंबधी निवेदन किरीट सोमय्यांना देण्यासाठी जमले होते.  यावेळी मोठा गोंधळ झाला. त्या गोंधळात किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले.त्यांच्या माकडहाडाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किरीट सोमय्यांकडून शिवसैनिकांचा खून करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह किरण साळी, सुरज लोखंडे, चंदन साळुंके, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे सनी गवते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेले शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेना सहसचिव किरण साळी यांच्यासह सात जण  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह किरण साळी, सुरज लोखंडे, चंदन साळुंके, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे सनी गवते या आठ जणांवर 143,149, 147,341, 337 व 336 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी गवते याला जामीन

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसैनिकांवर विविध कलमांअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनी गवते हा शिवसैनिक पोलिसांसमोर हजर झाला होता. सनी गवते या सनी गवते या शिवसैनिकाची जामिनावर सुटका करण्यात आली. आज इतर शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.

संजय मोरे यांच्याकडून किरीट सोमय्यांविरोधात तक्रार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत संजय मोरे यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

किरीट सोमय्या राज्यपालांना भेटणार

भाजप नेते किरीट सोमय्या  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भेटणार आहेत. तर, येत्या काही दिवसात गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी

Aurangabad | विद्यापीठाच्या ऑनलाइन पदवी परीक्षा आजपासून, अडीच लाख नोंदणी, कशी आहे तांत्रिक प्रक्रिया?

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.