…जेव्हा आयपीएस अधिकारी सरकारी दवाखान्यात उपचार घेतात!

मूळचे सोलापूरचे असलेले गाजियाबादचे पोलिस अधिक्षक रोहित ताज पाटील यांनी कोव्हिडचे उपचार सोलापूरच्या सरकारी दवाान्यात घेतले. | SP Salman patil

...जेव्हा आयपीएस अधिकारी सरकारी दवाखान्यात उपचार घेतात!
SP Salman patil

सोलापूर : सरकारी हॉस्पिटल म्हटलं की नाकं मुरडणारी माणसं आपण पहिली असतील. नेते, उच्च पदस्थ अधिकारीच काय सामान्य माणसंसुद्धा आजारी पडल्यानंतर सरकारी दवाखान्याऐवजी खासगी दवाखान्याची पायरी चढतात. मात्र याला आयपीएस अधिकारी सलमान ताज पाटील अपवाद म्हणावे लागतील. मूळचे सोलापूरचे असलेले उत्तरप्रदेशच्या गाजीयाबादचे पोलीस अधीक्षक सलमान ताज पाटील सध्या कोरोनामुक्त झाले असून त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार न घेता शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. (SP Salman patil take A treatment At Solapur Civil Hospital)

सुट्टीवर आल्यानंतर लक्षणे जाणवल्यानंतर सलमान पाटील हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. गेल्या दहा दिवसापासुन सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. योग्य उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अगदी कमी वयात प्रतिकृल परिस्थितीवर मात करत सलमान यांनी आयपीएस परीक्षा उत्तीर्ण केली म्हणून त्यांची अधिकारीपदावर निवड झाल्यानंतर संपर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची भावना आयपीएस अधिकारी सलमान ताज यांनी व्यक्त केली.

कोरोना संक्रमणापासून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी कोव्हिडच्या काळात बरीच मेहनत घेतली असून आजही उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर मेहनत घेत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवल्याचा डॉक्टर आणि इथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची पावती मिळालीय. आज उपचारानंतर घरी परतणाऱ्या सलमान ताज यांचा सन्मान रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला.

(SP Salman patil take A treatment At Solapur Civil Hospital)

हे ही वाचा :

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

राज्यपालांना परवानगी नाकारलेलं विमान कुणाचं? नियम काय सांगतो?

Published On - 1:13 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI